मुंबई : आठवड्याच्या सुरुवातीला दमदार तेजीने सुरुवात करणाऱ्या भारतीय शेअर बाजारात दिवसअखेरीस मोठी घसरण पाहायला मिळाली. जागतिक पातळीवरील वाढत्या भू-राजकीय तणावाचा परिणाम बाजारावर दिसून आला असून सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, तर निफ्टी २३,४०० च्या खाली घसरून बंद झाला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल ३.७५ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. (Share Market Crash)
https://prahaar.in/2026/06/01/ril-reliance-industries-limited/
दिवसभरातील व्यवहारात बीएसई सेन्सेक्सने सुरुवातीला चांगली कामगिरी करत ७५,३६७ अंकांचा उच्चांक गाठला होता. मात्र नंतर विक्रीचा दबाव वाढल्याने निर्देशांक घसरला आणि अखेरीस ५०८ अंकांच्या घसरणीसह ७४,२६७.३४ अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टी ५० निर्देशांकही २३,७३३ अंकांपर्यंत पोहोचल्यानंतर घसरला आणि १६५.१५ अंकांच्या तोट्यासह २३,३८३.६० अंकांवर स्थिरावला. (Share Market Crash)
क्षेत्रनिहाय पाहता, आयटी क्षेत्राने बाजाराला काहीसा आधार देण्याचा प्रयत्न केला. टेक महिंद्रा, इन्फोसिस आणि टीसीएस यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. मात्र इतर बहुतांश क्षेत्रांमध्ये विक्रीचा दबाव कायम राहिला. एफएमसीजी निर्देशांकात सुमारे २.५ टक्क्यांची घसरण झाली, तर ऑटो, पीएसयू बँक आणि रिअल्टी क्षेत्रात २ टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवली गेली. बँकिंग क्षेत्रातील निर्देशांकही जवळपास १ टक्क्यांनी खाली आला. (Share Market Crash)
https://prahaar.in/2026/06/01/provision-of-energy-provision-of-energy/
सेन्सेक्समधील ३० प्रमुख कंपन्यांपैकी केवळ ६ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह बंद झाले, तर २४ कंपन्यांमध्ये घसरण झाली. एचयूएल, आयटीसी आणि एनटीपीसी यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण नोंदवली गेली. (Share Market Crash)
https://prahaar.in/2026/06/01/gst-revenue-collection-crosses-rs-1-94-lakh-crore-in-may/
तज्ज्ञांच्या मते, जागतिक राजकीय घडामोडी, कच्च्या तेलाच्या किंमतीतील चढ-उतार आणि परदेशी गुंतवणूकदारांची भूमिका यावर आगामी काही दिवसांत बाजाराची दिशा अवलंबून राहणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगून दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. (Share Market Crash)