नवी दिल्ली : भारताच्या अत्याधुनिक आणि जगातील सर्वात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्रांपैकी एक मानल्या जाणाऱ्या ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र प्रणालीला (Brahmos Missile Deal) आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी वाढत आहे. भारताने व्हिएतनामसोबत ब्रह्मोस विक्रीचा करार केला असून, इंडोनेशियासोबतही अशीच चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह (Rajesh Kumar Singh) यांनी दिली आहे.
https://prahaar.in/2026/06/01/massive-explosion-in-myanmar-55-dead-more-than-100-houses-damaged/
भारताचा वाढता संरक्षण निर्यात प्रभाव अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, भारत केवळ विश्वासू आणि मैत्रीपूर्ण देशांनाच अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान पुरवतो. त्यामुळे आशियाई देशांमध्ये भारताच्या संरक्षण उद्योगाबाबत विश्वास अधिक दृढ होत आहे. (Brahmos Missile Deal)
जागतिक पातळीवरील वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण पुरवठा साखळी मजबूत करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. कोणत्याही एका देशावर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Brahmos Missile Deal)
https://prahaar.in/2026/06/01/crude-oil-prices-hit-record-highs/
गेल्या काही वर्षांत भारताने संरक्षण उत्पादन क्षेत्रात मोठी प्रगती केली असून खासगी कंपन्यांचा सहभागही लक्षणीय वाढला आहे. सध्या देशातील एकूण संरक्षण उत्पादनात सरकारी कंपन्यांचा वाटा सुमारे ७२ टक्के आहे, तर उर्वरित वाटा खासगी क्षेत्राचा आहे. (Brahmos Missile Deal)
आज भारत केवळ संरक्षण आयातदार देश राहिला नसून, तो आता एक विश्वासार्ह संरक्षण निर्यातदार म्हणून उदयास येत आहे. क्षेपणास्त्र प्रणाली, लढाऊ विमाने आणि युद्धनौका निर्मितीमध्ये आत्मनिर्भरतेकडे भारताची वाटचाल वेगाने सुरू असल्याचे या परिषदेत अधोरेखित करण्यात आले. (Brahmos Missile Deal)