Home ब्रेकिंग न्यूज Myanmar Massive Explosion : म्यानमारमध्ये भीषण स्फोट; ५५ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक घरांचे नुकसान

Myanmar Massive Explosion : म्यानमारमध्ये भीषण स्फोट; ५५ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक घरांचे नुकसान

0
Myanmar Massive Explosion : म्यानमारमध्ये भीषण स्फोट; ५५ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक घरांचे नुकसान

म्यानमार : म्यानमारच्या शान प्रांतात झालेल्या भीषण स्फोटात (Myanmar Massive Explosion) किमान ५५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, हा स्फोट रविवारी दुपारी चीन सीमेवरील नामखाम टाउनशिपमधील काउंग तात गावात झाला.

बंडखोर संघटना ताआंग नॅशनल लिबरेशन आर्मी (टीएनएलए)ने दावा केला आहे की, खाणकामासाठी साठवून ठेवलेल्या स्फोटक पदार्थांमध्ये निष्काळजीपणामुळे हा स्फोट झाला. माध्यमांच्या अहवालानुसार, या स्फोटामुळे संपूर्ण गावात मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.मृतांमध्ये २५ महिला आणि ३० पुरुषांचा समावेश आहे. दुर्घटनेनंतर मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून बचाव पथके ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेत आहेत. तसेच नुकसानग्रस्त इमारती आणि उद्ध्वस्त घरांमधून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. (Myanmar Massive Explosion)

https://prahaar.in/2026/06/01/crude-oil-prices-hit-record-highs/

स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, या स्फोटात १०० हून अधिक घरे नुकसानग्रस्त झाली आहेत. गावाचा एक भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत.टीएनएलएच्या राजकीय संघटना पलाउंग स्टेट लिबरेशन फ्रंटने टेलिग्रामवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. (Myanmar Massive Explosion)

https://prahaar.in/2026/05/31/hezbollah-israel-conflict-israel-captures-hezbollahs-beaufort-fort/

संघटनेने म्हटले आहे की, स्फोटाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असून या घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. तसेच प्रभावित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही टीएनएलएने दिले आहे.दरम्यान, स्थानिक प्रशासन आणि मदत यंत्रणा नुकसानीचा आढावा घेण्यात व्यस्त आहेत, तर बचाव पथके दुर्घटनेतून बचावलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी सातत्याने मोहीम राबवत आहेत. (Myanmar Massive Explosion)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here