Home क्रीडा Badminton Competition : ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

Badminton Competition : ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

Badminton Competition : ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
kerala kho kho

जोसेफ दिलराज आणि अक्षितची सुवर्ण कामगिरी

ठाणे (प्रतिनिधी) :

केरळमधील त्रिशूर येथे झालेल्या प्रतिष्ठेच्या अखिल भारतीय आमंत्रित बॅडमिंटन स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या जोसेफ दिलराज आणि अक्षित या जोडीने पुरुष दुहेरी गटात शानदार विजेतेपद पटकावले. नुकत्याच त्रिशूरमधील हायलाईट मॉल येथे पार पडलेल्या या स्पर्धेत देशातील अव्वल आणि निमंत्रित अशा केवळ आठ पुरुष दुहेरी जोड्यांचा सहभाग होता.

https://prahaar.in/2026/06/01/japan-stops-indias-victory-streak/

स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात जोसेफ आणि अक्षित यांनी उत्कृष्ट समन्वय, आक्रमक स्मॅशेस आणि अचूक कोर्ट कव्हरेजच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवले. अंतिम सामन्यातही त्यांनी आत्मविश्वासपूर्ण खेळ करत विजेतेपदावर मोहोर उमटवली.

https://prahaar.in/2026/06/01/md-drugs-worth-rs-4-crore-seized-in-nagpur-jaripatka-police-take-major-action/

ठाणे पालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेअंतर्गत जोसेफ दिलराज सराव करतो. तसेच मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्या मार्गदर्शनाखाली मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर, मितेश हाजीरनिस, यांच्या प्रशिक्षणातून अनेक खेळाडू राष्ट्रीय स्तरावर यश मिळवत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here