नवी दिल्ली : देशाचे २७ वे नौदल प्रमुख म्हणून ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी रविवारी पदभार स्वीकारला. त्यांनी सांगितले की, आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस ते भारतीय नौदल अधिक सक्षम, मजबूत, वेगवान आणि प्रभावी बनविण्यासाठी समर्पित करतील, जेणेकरून ते राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रीय विकासाच्या हितांची प्रभावीपणे सेवा करू शकेल. भारतीय नौदलाने ऑपरेशनल सज्जता आणि युद्धसज्जतेतील सर्वोच्च स्तर कायम राखावा, हीच त्यांची सर्वात मोठी प्राथमिकता असेल, जेणेकरून देशाची सुरक्षा आणि आर्थिक हितसंबंधांचे संरक्षण करता येईल.
सिंगापूर : सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि मुहम्मद फिक्री यांचा १८-२१, २१-१७, २१-१६ ने पराभव करत ...
त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केले आणि त्यानंतर साउथ ब्लॉक लॉन्स येथे त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन म्हणाले की, "भारतीय नौदल संयुक्तता, आत्मनिर्भरता आणि स्वदेशीकरणासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे आणि यावरच माझे मुख्य लक्ष असेल. भारतीय नौदलाला जगातील सर्वोत्तम व्यावसायिक दलांपैकी एक मानले जाते. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचे कल्याण, व्यावसायिक कामगिरी आणि वैयक्तिक विकास यांना मी सर्वोच्च प्राधान्य देईन."
त्यांनी निवृत्त होत असलेले नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, देशासाठी त्यांची सेवा अत्यंत उल्लेखनीय आणि प्रेरणादायी राहिली आहे. ते अत्यंत प्रभावी चीफ ऑफ नेव्हल स्टाफ ठरले असून त्यांच्या नेतृत्वाखाली नौदलाला प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन आणि दूरदृष्टीचा लाभ मिळाला.
भावुक होत ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन म्हणाले, "आज २७ वे चीफ ऑफ नेव्हल स्टाफ म्हणून मी अत्यंत नम्रता, जबाबदारी, अभिमान आणि कृतज्ञतेच्या भावनेने ही जबाबदारी स्वीकारत आहे. भारतीय नौदल आणि देशाची सेवा करण्याची ही संधी मिळाल्याबद्दल
नवी दिल्ली : ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री इव्हेट कूपर चीन दौऱ्यानंतर भारताच्या भेटीवर येणार आहेत. या दौऱ्यात त्या भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर ...



