पनवेल : पनवेल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या एका सीएनजी वाहनाला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संबंधित वाहन पूर्णपणे जळून खाक झाले आहे. (CNG Car Fire)
https://prahaar.in/2026/06/01/nashik-police-takes-major-action-even-before-the-final-thrill-of-ipl/
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तत्परता दाखवत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. काही वेळाच्या अथक प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे विझवण्यात यश आले. त्यामुळे आग इतर वाहनांपर्यंत किंवा परिसरातील इमारतींपर्यंत पसरण्याचा धोका टळला. (CNG Car Fire)
https://prahaar.in/2026/06/01/lpg-gas-cylinder-price-lpg-consumers-get-another-shock-gas-cylinder-price-hike-new-rates-effective-from-today/
दरम्यान, वाहनाला आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सीएनजी यंत्रणेमध्ये बिघाड झाला होता की अन्य काही कारणामुळे आग लागली, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाच्या तातडीच्या कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. (CNG Car Fire)
View this post on Instagram