Home ब्रेकिंग न्यूज ‘मान्सून’चे आगमन लांबले?

‘मान्सून’चे आगमन लांबले?

0
‘मान्सून’चे आगमन लांबले?
Maharashtra Monsoon

मुंबई : ‘आज येईल, उद्या येईल’, म्हणून संपूर्ण देश ज्याची चातकासारखी वाट पाहत आहे, तो नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून अजूनही येण्याची चिन्हे दिसत नाहीत. आधी मान्सून १ जून रोजीच केरळमध्ये दाखल होणार असल्याची हवामान विभागाने सांगितल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता ऐन उन्हाच्या कडाक्यात नागरिकांचा काहीसा भ्रमनिरास करणारी बातमी समोर आली आहे. देशातील बदलत्या हवामानामुळे मान्सूनचा वेग मंदावला असून, त्याच्या आगमनाची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे.
https://prahaar.in/2026/05/29/farmers-are-worried-about-the-forecast-of-the-meteorological-department-that-there-will-be-less-rain-this-year/

हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, अंदमान आणि श्रीलंकेपर्यंत पोहोचलेला मान्सून भारताच्या सीमेजवळ येऊन रेंगाळला आहे. त्यामुळे आता मान्सून ३ ते ४ जूनच्या सुमारास केरळमध्ये (देवभूमी) पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केरळमधील या विलंबामुळे महाराष्ट्रातही यंदा मान्सून दाखल होण्यास काही दिवस उशीर होणार आहे.हवामान शास्त्रज्ञांच्या मते, मान्सूनची वाटचाल मंदावली असून या स्थितीला ‘मान्सूनचे मृदू आगमन’ असे संबोधले जाते. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्राकार परिस्थितीमुळे मान्सूनच्या वाऱ्यांना खेचणारी एक वेगळी यंत्रणा तयार झाली आहे. परिणामी, बाष्पाने भरलेले नैऋत्य मोसमी वारे कमकुवत पडले असून मान्सूनची पुढे जाणारी गती थंडावली आहे. या स्थितीला मान्सून मृदू आगमन असे संबोधले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here