प्रश्नपत्रिका पोहोचवण्याची जबाबदारी वायुदलावर
नवी दिल्ली : देशभरात सातत्याने गाजत असलेल्या वैद्यकीय प्रवेशासाठीच्या ‘नीट’ (NEET) परीक्षेतील घोटाळे आणि पेपरफुटीच्या (Paper Leak) पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता ॲक्शन मोडमध्ये (Action Mode) आले आहे. आगामी २१ जून रोजी होणारी नीटची फेरपरीक्षा अत्यंत पारदर्शक, सुरक्षित व योग्य रीतीने पार पाडण्यासाठी सरकारने थेट भारतीय लष्कराची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे, तर देशातील सर्व परीक्षा केंद्रांवर (Exam Centre) गोपनीय पेपर्स सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी भारतीय वायुदलाची (Indian Air Force) मदत घेतली जाणार आहे. प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली.
नीटच्या फेरपरीक्षेच्या नियोजनासंदर्भात गुरुवारी देशाची राजधानी दिल्लीमध्ये एक अत्यंत उच्चस्तरीय बैठक पार पडली. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्या अधिकृत निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह, सीबीएसईचे वरिष्ठ अधिकारी आणि पंतप्रधान कार्यालयातील काही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
https://prahaar.in/2026/05/29/a-speeding-kia-car-met-with-a-horrific-accident-in-mulund-a-vegetable-vendor-woman-died-on-the-spot-two-others-were-seriously-injured/
या बैठकीत २१ जून रोजी होणाऱ्या फेरपरीक्षेच्या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी प्रसिद्धी माध्यमांशी (Media) संवाद साधताना या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली. परीक्षेतील वाढते गैरप्रकार रोखण्यासाठी आणि देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचा तसेच पालकांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. या बैठकीत नीट परीक्षा अधिक पारदर्शक आणि ‘फुलप्रूफ’ करण्याबाबत विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.
परीक्षा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर तांत्रिक सुधारणा केल्या जाणार असून, संवेदनशील परीक्षा केंद्रांवर कडक पहारा ठेवण्यात येणार आहे. पेपर लीकचा कोणताही मार्ग उरणार नाही, अशा प्रकारे तांत्रिक आणि मानवी सुरक्षा यंत्रणा तैनात केली जाईल. पेपर वाहतुकी दरम्यान होणारे गैरप्रकार टाळण्यासाठीच वायुदलाच्या विशेष विमानांची मदत घेतली जाणार आहे.
नीट परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर देशभरातून मोदी सरकारवर जोरदार टीका झाली होती. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होत असल्याच्या तक्रारींनंतर आता खुद्द गृह आणि संरक्षण यंत्रणा या परीक्षेत लक्ष घालत आहेत. लष्कर आणि वायुदलाच्या थेट सहभागामुळे परीक्षा केंद्रांवर पेपर पोहोचण्यापासून ते परीक्षा संपेपर्यंत कडेकोट बंदोबस्त असणार आहे. आता २१ जूनच्या फेरपरीक्षेत कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी यंत्रणा दिवस-रात्र काम करत आहेत.
https://prahaar.in/2026/05/29/shocking-incident-in-pune-8-people-from-dapodi-phugewadi-area-die-on-the-same-day/
बँक डिटेल्स (Bank Details) न दिलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा
एनटीएकडून नीट यूजी २०२६ परीक्षेसाठी घेण्यात आलेले शुल्क परत केले जात आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या बँक खात्याची माहिती सादर करण्यास सांगितले आहे. आतापर्यंत १३ लाख विद्यार्थ्यांनी बँक खात्याची माहिती दिली असून, ज्या विद्यार्थ्यांनी माहिती दिली नाही. त्यांच्यासाठी अंतिम मुदत वाढवली आहे. विद्यार्थी आता अधिकृत रजिस्ट्रेशन पोर्टलवर २२ जून २०२६ रोजी रात्री ११.५० पर्यंत त्यांची माहिती भरू शकणार आहेत.
https://prahaar.in/2026/05/28/will-topple-government-if-it-recognize-israel-lashkar-e-taibas-open-threat-to-pakistan/
पेपरफुटीनंतर १२ मे रोजीची परीक्षा रद्द
नीटची परीक्षा ३ मे रोजी भारतातील ५५१ आणि परदेशातील १४ शहरांमध्ये झाली होती, ज्यात २२ लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. पेपरफुटीनंतर १२ मे रोजी ती रद्द करण्यात आली.