नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना इंधन बचत आणि संसाधनांचा योग्य वापर यासाठी कारपूलिंगचा अवलंब करण्याचे स्पष्ट आवाहन केले.
बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले, “जेव्हा आपण एकाच ठिकाणाहून निघून एकाच ठिकाणी जातो, तेव्हा कारपूलिंगचा पर्याय का निवडू नये?” त्यांच्या या सूचनेमागे केवळ इंधन बचत नव्हे तर प्रशासनात शिस्त, कार्यक्षमता आणि पर्यावरणपूरक दृष्टीकोन रुजवण्याचा संदेश असल्याचे मानले जात आहे.
https://prahaar.in/2026/05/28/twisha-sharma-case-big-action-after-7-hours-of-interrogation-mother-in-law-giribala-singh-arrested-cbi-investigation-in-full-swing/
या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारकडून नागरिकांनाही सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करण्याचे, तसेच वैयक्तिक वाहनांचा वापर शक्य तितका कमी करण्याचे आवाहन केले जात आहे. हवामान बदल आणि प्रदूषण नियंत्रणाच्या व्यापक धोरणाचा हा भाग असल्याचेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. (PM Narendra Modi)
याच बैठकीत पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) मंत्र्यांना जनतेशी अधिक सक्रिय संवाद साधण्याचा आणि नियमितपणे लोकांमध्ये वेळ घालवण्याचा सल्ला दिला. यामुळे धोरणनिर्मिती अधिक लोकाभिमुख होईल आणि सरकार–जनता संवाद अधिक मजबूत होईल, असे त्यांनी नमूद केले.
https://prahaar.in/2026/05/28/deepali-sayyad-receives-threats-over-rupali-chakankars-stance-she-asserts-she-will-uphold-that-position-fearlessly-controversy-erupts-over-the-maharashtra-epstein-files/
या संदेशानंतर बैठकीनंतरच्या घडामोडींमध्येही त्याचा परिणाम दिसून आला. बुधवारी संध्याकाळी काही राज्यमंत्री एकाच वाहनातून कर्तव्य भवन-३ येथे पोहोचले आणि तेथून आयोजित प्रगती बैठकीत व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी झाले. या घडामोडीमुळे प्रशासनात पंतप्रधानांच्या सूचनांचा तत्काळ प्रभाव दिसून आल्याचे मानले जात आहे. (PM Narendra Modi)