ट्विशा शर्मा मृत्यू (Twisha Sharma Case) प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत आरोपी गिरिबाला सिंह यांना अटक केली आहे. उच्च न्यायालयाने त्यांची अग्रिम जामीन याचिका रद्द केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर सीबीआयची टीम थेट भोपाळ येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचली आणि त्यांना ताब्यात घेतले. सध्या त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी एम्स भोपाळ येथे नेण्यात आले आहे. (Twisha Sharma Case)
https://prahaar.in/2026/05/28/ivory-smuggling-racket-busted-indian-ivory-smuggling-busted-three-arrested-with-4-kg-elephant-tusks/
या प्रकरणाचा तपास मध्य प्रदेश पोलिसांकडून सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आला असून, समर्थ सिंह सध्या सीबीआयच्या ताब्यात आहेत. दरम्यान, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने यापूर्वी गिरिबाला सिंह यांना दिलेली अग्रिम जामीन मंजूर करणारी आदेश रद्द केली होती. (Twisha Sharma Case)
https://prahaar.in/2026/05/28/indian-student-brutally-murdered-in-canada-was-she-murdered-because-she-was-indian-truth-revealed/
सध्या सीबीआय या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून, पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.