Home साप्ताहिक अर्थविश्व Gold Silver Rate : ग्राहकांना दिलासा! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम

Gold Silver Rate : ग्राहकांना दिलासा! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम

0
Gold Silver Rate : ग्राहकांना दिलासा! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम
gold silver

आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा थेट परिणाम पुन्हा एकदा देशांतर्गत सराफा बाजारावर दिसून आला असून, सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. सततच्या चढ-उतारांनंतर आजचा दिवस ग्राहकांसाठी दिलासादायक ठरला आहे. (Gold Silver Rate)

सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात तब्बल २ हजार रुपयांची घसरण झाली असून, चांदीच्या दरातही सुमारे ४ हजार रुपयांपर्यंत घट झाली आहे. गेल्या काही दिवसांतील घसरण पाहता सोन्याचे दर जवळपास ४ हजार रुपयांनी तर चांदीचे दर तब्बल १२ हजार रुपयांनी खाली आले आहेत. त्यामुळे बाजारात गुंतवणूकदार आणि ग्राहकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. (Gold Silver Rate)

https://prahaar.in/2026/05/28/singapore-open-2026-pv-sindhu-lakshya-sen-and-satwik-chirag-advance-strongly-indias-strong-claim-in-the-quarterfinals/

तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक आर्थिक अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या मागणीत घट झाली आहे, ज्याचा थेट परिणाम भारतीय बाजारावर दिसून येत आहे. (Gold Silver Rate)

आजच्या दरानुसार, २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹१५,६०६ इतका नोंदवण्यात आला असून तो कालच्या तुलनेत ₹२३८ ने कमी आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर ₹१४,३०५ प्रति ग्रॅम तर १८ कॅरेट सोन्याचा दर ₹११,७०४ प्रति ग्रॅम इतका आहे. (Gold Silver Rate)

चांदीच्या दरातही मोठी घसरण दिसून आली असून, प्रति ग्रॅम चांदी २७५ तर प्रति किलो चांदी ₹२,७५,००० वर पोहोचली आहे. एका दिवसातच चांदीच्या दरात तब्बल ₹१०,००० पर्यंत घसरण झाल्याची नोंद करण्यात आली आहे, ज्यामुळे सराफा बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. (Gold Silver Rate)

https://prahaar.in/2026/05/28/meta-paid-subscription-plan-for-instagram-facebook-whatsapp/

दरम्यान, बकरीद सणामुळे मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) चे व्यवहार पहिल्या सत्रात बंद राहिल्याने जागतिक संकेतांचा पुढील ट्रेडिंगवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते, आगामी काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरांची दिशा पूर्णपणे आंतरराष्ट्रीय घडामोडी, डॉलरची स्थिती आणि भू-राजकीय तणावावर अवलंबून राहणार आहे. (Gold Silver Rate)

या घसरणीमुळे काही ग्राहकांनी खरेदीसाठी संधी मानली असली तरी गुंतवणूकदारांमध्ये मात्र सावधगिरीचे वातावरण दिसून येत आहे. बाजारातील अस्थिरता पाहता पुढील काळात दर पुन्हा बदलू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Gold Silver Rate)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here