Home ताज्या घडामोडी Pune : वाढत्या गरमीमुळे धरणाचं पाणी आठलं आणि झाला मोठा चमत्कार…ऐकून व्हाल चक्क

Pune : वाढत्या गरमीमुळे धरणाचं पाणी आठलं आणि झाला मोठा चमत्कार…ऐकून व्हाल चक्क

0
Pune : वाढत्या गरमीमुळे धरणाचं पाणी आठलं आणि झाला मोठा चमत्कार…ऐकून व्हाल चक्क
prachin mandir

पुणे : धरणाची पातळी वेगाने खाली गेल्यामुळे, वर्षभर पाण्यात लुप्त असणारे ऐतिहासिक ‘कांबरेश्वर मंदिर’ गेल्या आठ दिवसांपासून पाण्याबाहेर येऊ लागले आहे. भोरमधील भाटघर धरणामध्ये 7 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा राहिला आहे.प्राचीन ऐतिहासिक मंदिर पाहण्यासाठी भाविकांनी आणि इतिहास संशोधकांणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे .दोनशे वर्ष पुराण मंदिर पाहून सर्वांचं मन तृप्त झालं आहे . जवळ जवळ ५० किलो मीटर आत हे मंदिर आहे .

१९२७ मध्ये इंग्रज सरकारने हे धरण बांधले आहे . कालांतराने पाण्याचे प्रमाण वाढत असल्या मुले हे मंदिर पाण्या खाली गेलं होत . परंतु मागील काही वर्षा पासून वाढत्या तापमानामुळे ह्या धरणाचं पाणी आठत . मे महिण्याच्या अखेरीस जेव्हा पाण्याचं प्रमाण कमी होत तेव्हा हे मंदिर बाहेर येत . या मंदिराचं मूळ नाव ‘कर्महरेश्वर’ असल्याचं सांगितलं जातं. परंतु कांबरे गावाच्या हद्दीत असल्यामुळे ते ‘कांबरेश्वर’ म्हणून ओळखलं जातं. त्यामुळेच वास्तू विशारद, अभियंते, इतिहासप्रेमी आणि छायाचित्रकार या ठिकाणाला आवर्जून भेट देतात. दरवर्षी स्थानिक ग्रामस्थ मंदिरातील गाळ काढून स्वच्छता करतात, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

कसं आहे हे मंदिर?
अतिशय सुंदर आणि रेखीव कलाकृती केलेलं हे मंदिर आहे .पाण्यातही वास्तुकला भक्कम मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात नेहमी गुडघाभर पाणी असते. भाविक पाण्यात हात घालून स्वयंभू शिवलिंगाला स्पर्श करतात. मंदिरात पार्वती माता आणि नंदीची मूर्ती आहे. मंदिराच्या भिंतींचे बांधकाम आयताकृती दगडांचे असून, कळसाचे बांधकाम चुनखडक, वाळू आणि विटांमध्ये आहे. दरवर्षी येणाऱ्या गाळामुळे मंदिराच्या समोरील पाच पायऱ्या जमिनीखाली गाडल्या गेल्या आहेत. मंदिराच्या समोर प्राचीन शिळा आणि वीरगळ पाहावयास मिळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here