Home ब्रेकिंग न्यूज Nautapa Health Alert : पुढील सहा दिवस हे पदार्थ खाणे टाळा नाहीतर….

Nautapa Health Alert : पुढील सहा दिवस हे पदार्थ खाणे टाळा नाहीतर….

0
Nautapa Health Alert : पुढील सहा दिवस हे पदार्थ खाणे टाळा नाहीतर….
climate change, low angle view Thermometer on blue sky with sun shining in summer show increase temperature, concept global warming

राज्यात नवतपाला सुरुवात होताच उष्णतेचा कहर वाढला आहे. कडक ऊन, गरम वारे आणि वाढता उकाडा यामुळे शरीरावर मोठा ताण येत आहे. अशा परिस्थितीत चुकीचा आहार घेतल्यास आरोग्याची गंभीर निर्माण समस्या होऊ शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते,नवतपादरम्यान काही पदार्थ खाल्ल्याने शरीराचे तापमान अधिक वाढते आणि डिहायड्रेशन, हिटस्ट्रोक, उलट्या, जुलाब, अशक्तपणा यांसारख्या त्रासांचा धोका वाढतो.

तळलेले आणि मसालेदार पदार्थ टाळा

उन्हाळ्यात बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज, फरसाण, समोसे यांसारखे तळलेले आणि तेलकट पदार्थ शरीरासाठी धोकादायक ठरू शकतात. हे पदार्थ पचवण्यासाठी शरीराला अधिक ऊर्जा खर्च करावी लागते. त्यामुळे शरीरातील उष्णता वाढते आणि थकवा जाणवतो. तसेच जास्त तिखट आणि मसालेदार पदार्थांमुळे घाम अधिक येतो व शरीरातील पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे डिहायड्रेशनचा धोक्का अधिक वाढतो.

कोल्डड्रिंकपासून सावध राहा

उकाड्यात अनेक जण थंडावा मिळावा म्हणून कोल्डड्रिंक, सोडा किंवा एनर्जी ड्रिंक्सचे सेवन करतात. मात्र तज्ज्ञांच्या मते, या पेयांमधील साखर जास्त असते आणि कॅफिन शरीराला डिहायड्रेट करू शकते. चहा आणि कॉफीचे अतिसेवनही शरीरातील पाणी कमी करून उष्णतेचा त्रास वाढवू शकते.

https://prahaar.in/2026/05/26/sunscreen-sunscreen-is-a-must-every-day/

रेड मीट आणि पॅकेज्ड स्नॅक्स घेणे टाळा

रेड मीट पचवण्यासाठी शरीराला अधिक मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे शरीराचे तापमान वाढण्याची शक्यता असते. याशिवाय चिप्स, वेफर्स, पॅकेज्ड स्नॅक्स यात जास्त मीठ असतो. अधिक सोडियममुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होऊ शकते.

शिळे अन्न खाणे टाळा

नवतपाच्या काळात उघड्यावर ठेवलेले जेवण किंवा खाण्याचे पदार्थ लवकर खराब होतात. त्यामुळे फूड पॉयजनिंग, जुलाब, उलट्या अशा आजारांचा धोका वाढतो. तसेच अतिशय थंड पदार्थ किंवा मद्यपान केल्यास शरीरावर उलटे परिणाम होऊ शकतात.

मग काय खाल्लं पाहिजे?

तज्ज्ञांच्या मते, नवतपादरम्यान शरीर थंड आणि हायड्रेट ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. यासाठी नारळपाणी, ताक, लस्सी, सत्तू (Sattu flour), कलिंगड, काकडी आणि ताजी फळे फायदेशीर ठरतात. दिवसभर भरपूर पाणी पिणे आणि रिकाम्या पोटी बाहेर न पडणेही गरजेचे आहे. योग्य आहार आणि काळजी घेतल्यास नवतपाच्या तीव्र उष्णतेपासून स्वताचे संरक्षण करणे शक्य होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here