Home महाराष्ट्र नाशिक Ashok Kharat : अशोक खरातची ‘या’ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी

Ashok Kharat : अशोक खरातची ‘या’ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी

0
Ashok Kharat : अशोक खरातची ‘या’ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी

Ashok Kharat : माहाराष्ट्राला हादरवणाऱ्या भोंदू अशोक खरातची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधित कायद्यांतर्गत (पीएमएलए) स्थापन विशेष न्यायालयाने मंगळवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) खरात याला वाढीव कोठडी देण्याची मागणी न केल्याने विशेष न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

कोठडीची मुदत संपल्याने खरात याला मंगळवारी विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. मात्र, सध्या त्याच्या वाढीव कोठडीची आवश्यकता नसल्याचे ईडीतर्फे स्पष्ट करण्यात आले. विशेष म्हणजे खरात याने चौकशीत सहकार्य केले नाही आणि उडवाउडवीची उत्तरे दिली, असा दावाही ईडीने एकीकडे केला. भविष्यात खरात याच्या चौकशीची आवश्यकता भासल्यास ती मागण्याबाबतचा अधिकार राखून ठेवत असल्याचे न्यायालयाला सांगितले.

https://prahaar.in/2026/05/27/athe-dark-deeds-of-the-fraudster-ashok-kharat-will-now-be-revealed-in-a-movie/

खंडणी आणि धार्मिक फसवणुक

अशोक खरातवर ४७.७४ कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. ईडीच्या (ED) तपासानुसार, अशोक खरातने खंडणी आणि धार्मिक फसवणुकीच्या माध्यमातून मिळवलेले अंदाजे ४७.७४ कोटी रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांद्वारे फिरवले आहेत. हा गुन्हा करून कमावलेला काळा पैसा कायदेशीर दाखवण्यासाठी त्याने स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या नावावर अनेक मौल्यवान स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचे तपासात उघड झाले आहे. मोठ्या आर्थिक गैरव्यवहारासाठी खरातने एक मोठे जाळे तयार केले होते. त्याने भक्तांना संमोहन आणि इतर धमक्या देऊन त्यांच्या संमतीशिवाय त्यांची कागदपत्रे मिळवली.

https://prahaar.in/2026/05/27/nashik-news-four-people-including-a-husband-and-wife-drowned-in-kashyapi-dam/

या कागदपत्रांचा (Documents) गैरवापर करून त्याने राहता येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये (Samata Urban Cooperative Credit Society) तब्बल ६० बेनामी बँक खाती उघडली. धक्कादायक बाब म्हणजे, यातील ४३ खाती मे २०२१ मध्ये एकाच दिवशी उघडण्यात आली होती. या खात्यांचा वापर करून त्याने कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद रोख व्यवहार केले. ईडीने खरातला मंगळवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर. बी. रोटे यांच्यापुढे हजर केले होते. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने (Court) खरातची ९ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here