Home क्राईम Dombivli Scam : प्रेमाच्या जाळ्यात ओढून १४० पेक्षा जास्त तरुणींची फसवणूक; आदर्श म्हात्रे मानपाडा पोलिसांच्या ताब्यात

Dombivli Scam : प्रेमाच्या जाळ्यात ओढून १४० पेक्षा जास्त तरुणींची फसवणूक; आदर्श म्हात्रे मानपाडा पोलिसांच्या ताब्यात

0
Dombivli Scam : प्रेमाच्या जाळ्यात ओढून १४० पेक्षा जास्त तरुणींची फसवणूक; आदर्श म्हात्रे मानपाडा पोलिसांच्या ताब्यात
Kalyan Crime

Adarsh Mhatre Scam : सोशल मीडियावर मैत्री करून तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्यांच्या नावावर लाखो रुपयांचे कर्ज काढणाऱ्या भामट्याला मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आदर्श म्हात्रे याला मानपाडा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणामुळे डोंबिवली आणि पनवेल परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.यापूर्वी आदर्शला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. मात्र यावेळी डोंबिवलीतील एका तरुणीने आदर्शच्या विरुद्ध तक्रार दाखल केल्यांनतर मानपाडा पो़लिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदर्श म्हात्रे सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींशी संपर्क साधत असे. सुरुवातीला गोड बोलून मैत्री करायची आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण करून संबंधित तरुणींच्या नावावर विविध बँकांमधून लाखो रुपयांची कर्जे काढायचा. असा या आरोपीचा पॅटर्न होता.

१४० पेक्षा जास्त तरुणींना जाळ्यात ओढले

तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे , आरोपीने तब्बल १४० पेक्षा जास्त तरुणींना आपल्या जाळ्यात ओढल्याचा संशय आहे. यापैकी ११ महिलांनी पुढे येत तक्रारी दाखल केल्या आहेत. विशेष म्हणजे फसवणुकीला बळी पडलेल्या अनेक महिला उच्चशिक्षित असून कॉर्पोरेट, फायनान्स आणि व्यावसायिक क्षेत्रात मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांनाच आरोपी लक्ष्य करत असल्याचे तपासातून उघड झाले आहे. आरोपी आदर्श म्हात्रे सध्या मानपाडा पोलीसांच्या ताब्यात आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे. यापूर्वी नवी मुंबई पोलिसांनी आदर्श म्हात्रेला अटक केली होती. त्यानंतर डोंबिवलीतील एका पीडित तरुणीच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेतले आहे. सध्या पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून अजून काही पीडित महिला पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावरील ओळखी आणि ऑनलाईन नातेसंबंधांमधील धोके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here