नोव्हाक जोकोविच (Novak Djokovic) याने फ्रेंच ओपन २०२६ स्पर्धेत विजयी सलामी देत आपल्या विक्रमी २५व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या मोहिमेला शानदार सुरुवात केली. पॅरिसमधील रोलाँ गॅरोस कोर्टवर झालेल्या पहिल्या फेरीच्या सामन्यात जोकोविचने फ्रान्सच्या जिओव्हानी म्पेत्शी पेरिकार्ड (Giovanni Mpetshi Perricard) याचा ५-७, ७-५, ६-१, ६-४ अशा सेट्समध्ये पराभव केला. (French Open 2026 Novak Djokovic)
https://prahaar.in/2026/05/25/national-record-holder-a-new-dawn-in-indian-athletics-vishal-t-k-creates-a-great-record/
विशेष म्हणजे, गेल्या १७ वर्षांत फ्रेंच ओपनच्या पहिल्या फेरीत जोकोविचविरुद्ध सेट जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. त्यामुळे सुरुवातीला या सामन्यात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. (French Open 2026 Novak Djokovic)
मात्र अनुभवी जोकोविचने दुसऱ्या सेटपासून आपला खरा खेळ दाखवायला सुरुवात केली. संयम, अचूक फटके आणि अनुभवाच्या जोरावर त्याने सामना हळूहळू आपल्या नियंत्रणात आणला. दुसरा सेट ७-५ ने जिंकल्यानंतर त्याचा आत्मविश्वास अधिक वाढला आणि तिसऱ्या सेटमध्ये त्याने अक्षरशः वर्चस्व गाजवत ६-१ अशी एकतर्फी बाजी मारली. (French Open 2026 Novak Djokovic)
https://prahaar.in/2026/05/24/shameful-incident-in-ipl-misbehavior-with-cheerleaders-high-voltage-drama-unfolds-on-the-field/
या विजयासह जोकोविचने आणखी एका ऐतिहासिक टप्प्याला गवसणी घातली. त्याने Roger Federer याचा विक्रम मागे टाकत सर्वाधिक ग्रँडस्लॅम एकेरी सामने जिंकणारा खेळाडू बनण्याचा मान पटकावला. (French Open 2026 Novak Djokovic)
https://prahaar.in/2026/05/24/sara-tendulkar-tendulkar-family-emotional-over-arjuns-debut-sister-sara-and-wife-sanias-special-post-in-the-news/
सामन्यानंतर बोलताना जोकोविचने प्रतिस्पर्ध्याचे कौतुक केले. तो म्हणाला, “जिओव्हानीविरुद्ध मी पहिल्यांदाच खेळत होतो. त्याची सर्व्हिस ओळखणे खूप कठीण होते. माझ्या कारकिर्दीत फार कमी खेळाडूंमध्ये अशी ताकद आणि वेग पाहायला मिळाला आहे.” (French Open 2026 Novak Djokovic)
आता सर्वांचे लक्ष जोकोविचच्या पुढील फेरीतील कामगिरीकडे लागले असून, तो यंदा इतिहास रचत २५वे ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकणार का, याची उत्सुकता टेनिस चाहत्यांमध्ये वाढली आहे. (French Open 2026 Novak Djokovic)