Home महाराष्ट्र नाशिक Nashik TCS Case : ‘हानिया कौन…’, ‘वहीं जो कन्व्हर्ट हुई…; निदा खानचे महत्त्वाचे चॅटिंग पोलिसांच्या हाती

Nashik TCS Case : ‘हानिया कौन…’, ‘वहीं जो कन्व्हर्ट हुई…; निदा खानचे महत्त्वाचे चॅटिंग पोलिसांच्या हाती

0
Nashik TCS Case : ‘हानिया कौन…’, ‘वहीं जो कन्व्हर्ट हुई…; निदा खानचे महत्त्वाचे चॅटिंग पोलिसांच्या हाती
Nida Khan

Nashik TCS Case : TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानची महत्त्वाची चॅटिंग पोलिसांच्या हाती लागली आहे. ‘आज हानिया के साथ बाहर जा रहीं हूँ…’, ‘हानिया कौन हैं…’, ‘वहीं जो कन्व्हर्ट हुई…’ या स्वरुपाचे ‘चॅटिंग’ संशयित निदा एजाज खान हिने तिच्या नातलगासोबत केल्याची माहिती विशेष तपास पथकाच्या तपासात स्पष्ट झाली असून, त्यातून महत्त्वपूर्ण खुलासे पुढे येत आहेत.

निदाचे ‘चॅटिंग’ पोलिसांच्या हाती

दरम्यान, निदा खान हिच्या जामीन अर्जावर आज, सोमवारी (दि. २५) नाशिकरोड न्यायालयात युक्तिवाद होणार असून, धर्मांतराच्या खटल्यातील पहिली सुनावणीदेखील पार पडणार आहे. संशयितांच्या कटानुसार पीडितेचे वर्तन सुरू झाल्यानंतर पीडितेचे नाव ‘हानिया’ ठेवण्यात आले होते. पीडितेचे मूळ नाव हे तिच्या धर्मानुसार महत्त्वाचे होते. त्यामुळेही नामकरणाचा डाव संशयितांनी आखला होता. त्यावरून निदाचे तिच्या पतीसमवेत झालेले ‘चॅटिंग’ पोलिसांच्या हाती लागले आहे. या गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ‘एसआयटी’ नियुक्त करून सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्याकडे तपासाची सूत्रे सोपवली आहेत.

https://prahaar.in/2026/05/25/discussions-are-underway-with-shiv-sena-ncp-regarding-the-location-of-nashik-chhatrapati-sambhajinagar-and-pune/

मतीन पटेल आज अखेर नाशिक पोलिसांसमोर हजर

दरम्यान, निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप असलेला एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल आज अखेर नाशिक पोलिसांसमोर हजर झाला आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयात मतीन पटेल आज दाखल झाला. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान अनेक दिवसांपासून फरार होती. अनेक दिवस ती पोलिसांना गुंगारा देत होती. दरम्यान या प्रकरणाचे धागेदोरे छत्रपती संभाजीनगरपर्यत पोहोचल्याचे समोर आले. एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याने निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप आहे.

निदा खानला पोलिसांपासून लपवून ठेवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्याप्रकरणी, एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याच्याभोवती पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गुन्हे शाखेने कायदेशीर नोटीस बजावल्यानंतर कोणतीही पळवाट न उरल्याने, आज सोमवारी ( २५ मे) पटेल स्वतःहून नाशिक पोलिसांसमोर हजर झाला.

दरम्यान TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिच्या जामीन अर्जावर आज, सोमवारी (दि. २५) नाशिकरोड न्यायालयात युक्तिवाद होणार असून, धर्मांतराच्या खटल्यातील पहिली सुनावणीदेखील पार पडणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे नाशिकरांचे लक्ष लागले आहे.

https://prahaar.in/2026/05/25/alcoholic-party-outside-prison-officers-residence/

संशयित आरोपींच्या बाजूने ‘मायनॉरिटी डिफेन्स कमिटी’

तर दुसरीकडे इस्लाम पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी आमदार आसिफ शेख (Asif Shaikh) यांनी आरोपींच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर या प्रकरणावर मोठे वक्तव्य केले आहे. निदा खान आणि इतर संशयितांच्या बचावासाठी या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानसह इतर ६ आरोपींच्या बाजूने ‘मायनॉरिटी डिफेन्स कमिटी’ उभी राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. ‘भोंदू अशोक खरात प्रकरण’ दाबण्यासाठीच हे प्रकरण जाणीवपूर्वक पुढे आणण्यात आले असून, टीसीएस (TCS) प्रकरणात कोणतेही तथ्य नसल्याचा दावा शेख यांनी केला आहे आहे. त्यामुळे आता हे प्रकरण काय वळण घेते हे पाहून महत्त्वाचं असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here