Home क्रीडा FIFA WORLD CUP 2026 : अखेरच्या सामन्यात ‘माद्रिद’चा विजयी

FIFA WORLD CUP 2026 : अखेरच्या सामन्यात ‘माद्रिद’चा विजयी

0
FIFA WORLD CUP 2026 : अखेरच्या सामन्यात ‘माद्रिद’चा विजयी
Madrid

डॅनी कार्व्हाजालला भावनिक निरोप 

माद्रिद (वृत्तसंस्था) :
स्पॅनिश ला लिगा फुटबॉल लीगच्या यंदाच्या हंगामाचा शेवट कमालीचा थरारक आणि नाट्यमय ठरला. अंतिम फेरीच्या सामन्यात रिअल माद्रिदने अॅथलेटिक बिलाबाओचा ४-२ असा धुव्वा उडवत हंगामाचा शेवट विजयाने केला.

https://prahaar.in/2026/05/25/discussions-are-underway-with-shiv-sena-ncp-regarding-the-location-of-nashik-chhatrapati-sambhajinagar-and-pune/

रिअल माद्रिदचा दिग्गज बचावपटू डॅनी कार्व्हाजाल आपल्या कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. त्याने दिलेल्या अप्रतिम पासवर गोंझालो गार्सियाने पहिला गोल केला. यानंतर इंग्लंडचा स्टार ज्युड बेलिंगहॅमने संघाची आघाडी मजबूत केली. हंगामात सर्वाधिक गोल करणाऱ्या फ्रान्सच्या किलियन एमबाप्पेने दूरवरून एक अचूक आणि वेगवान फटका मारत हंगामातील आपला २५ वा गोल नोंदवला, तर इब्राहिम डियाझने चौथा गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केले. कार्व्हाजाल जेव्हा मैदानाबाहेर जात होता, तेव्हा दोन्ही संघांच्या खेळाडूंनी ‘गार्ड ऑफ ऑनर’ देत त्याला मानवंदना दिली. या अखेरच्या फेरीत गुणतालिकेच्या तळाशी असलेल्या संघांमध्ये ‘रेलिगेशन’ (अवनती) टाळण्यासाठी जीवघेणी स्पर्धा पाहायला मिळाली. मॅलोर्काने आपला सामना जिंकूनही गोलफरकामुळे त्यांना दुसऱ्या विभागात जाण्यापासून स्वतःला वाचवता आले नाही. तर गेल्या वर्षी थेट युरोपियन चॅम्पियन्स लीग खेळणाऱ्या गिरोनाचा संघ यंदा ढिसाळ कामगिरीमुळे थेट दुसऱ्या विभागात घसरला, जो या हंगामातील सर्वात मोठा उलटफेर मानला जात आहे.

https://prahaar.in/2026/05/25/k-l-rahul-k-l-rahul-rained-on-the-eden-field/

दुसरीकडे, बार्सिलोना क्लबकडून आपला अखेरचा सामना खेळणाऱ्या पोलंडच्या दिग्गज स्ट्रायकर रॉबर्ट लेवांडोवस्कीने गोल झळकावून संघाला आघाडी मिळवून दिली होती. मात्र, व्हॅलेन्सियाने जबरदस्त पुनरागमन करत बार्सिलोनाचा ३-१ असा पराभव केला. इतर सामन्यांमध्ये, सेल्टा विगोने आगामी हंगामातील ‘युएफा युरोपा लीग’साठी पात्रता निश्चित केली.

https://prahaar.in/2026/05/25/national-record-holder-a-new-dawn-in-indian-athletics-vishal-t-k-creates-a-great-record/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here