अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुखचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये यशाची नवनवीन शिखरे सर करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा आणि इतिहासाचा पट मांडणाऱ्या या भव्य चित्रपटाला प्रेक्षकांनी भरपूर पसंत केले आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने १०० कोटींच्या उंबरठ्यावर धडक मारली आहे. चित्रपटगृहातील या तुफान यशानंतर आता हा चित्रपट ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर कधी प्रदर्शित होणार, याकडे जगभरातील शिवाजी महाराजप्रेमी आणि रिेशच्या चाहत्यांचे लक्ष आहे.
ओटीटी प्रदर्शनाबाबतची उत्सुकता आणि संभाव्य प्लॅटफॉर्म
https://prahaar.in/2026/05/24/pre-monsoon-rains-wreak-havoc-in-marathwada-winds-blow-away-roofs-of-houses-hailstorm-causes-major-damage-to-orchards/
पॅन इंडिया स्तरावर सहा भाषांमध्ये होणार प्रदर्शित
चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित झाला असला, तरी ओटीटीवर मात्र हा चित्रपट ‘पॅन इंडिया’ (Pan India) स्तरावर प्रदर्शित करण्याची तयारी निर्मात्यांनी केल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार, डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट मराठी आणि हिंदीसह तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा एकूण सहा भाषांमध्ये उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. यामुळे शिवरायांचा गौरवशाली इतिहास केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरातील विविध भाषा बोलणाऱ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
https://prahaar.in/2026/05/23/drsihyam-3-box-office-collection-drsihyam-3-makes-a-splash-at-the-box-office-it-has-made-record-breaking-earnings-surpassing-6-films-in-just-48-hours/
डिजिटल हक्कांसाठी कोट्यवधींचा करार