Home ब्रेकिंग न्यूज Maharashtra HSC Marksheet Date : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! ‘या’ तारखेपासून मिळणार मूळ गुणपत्रिका

Maharashtra HSC Marksheet Date : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! ‘या’ तारखेपासून मिळणार मूळ गुणपत्रिका

0
Maharashtra HSC Marksheet Date : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! ‘या’ तारखेपासून मिळणार मूळ गुणपत्रिका
HSC Marksheet

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांची मूळ गुणपत्रिका आणि इतर आवश्यक प्रमाणपत्रांची प्रतीक्षा संपणार आहे. राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये येत्या २५ मेपासून बारावीच्या विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका वितरित करण्यात येणार आहेत. (Maharashtra HSC Marksheet Date)

https://prahaar.in/2026/05/23/dhule-crime-the-beast-set-the-elderly-mother-on-fire/

शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार, सोमवार २५ मे रोजी दुपारी ३ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित कनिष्ठ महाविद्यालयातून गुणपत्रिका मिळण्यास सुरुवात होईल. यासोबतच स्थलांतर प्रमाणपत्र (Migration Certificate) आणि शाळा सोडल्याचा दाखला (LC) देखील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे उच्च शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Maharashtra HSC Marksheet Date)

फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी ऑनलाईन जाहीर करण्यात आला होता. निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये मूळ मार्कशीट कधी मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. विशेषतः अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी, व्यवस्थापन आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मूळ गुणपत्रिका आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होती. (Maharashtra HSC Marksheet Date)

https://prahaar.in/2026/05/23/delhi-high-court-allows-vinesh-phogat-to-participate-in-asian-games-trials/

दरम्यान, शिक्षण मंडळाने युद्धपातळीवर काम करत सर्व विभागीय मंडळांमार्फत गुणपत्रिका संबंधित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांपर्यंत पोहोचवल्या आहेत. गुणपत्रिका वाटपावेळी कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी महाविद्यालयांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन स्वतंत्र काउंटर किंवा वर्गनिहाय वाटप व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. (Maharashtra HSC Marksheet Date)

विद्यार्थ्यांनी गुणपत्रिका घेण्यासाठी जाताना स्वतःचे हॉल तिकीट किंवा ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. तसेच गुणपत्रिका मिळाल्यानंतर त्यावरील नाव, आईचे नाव, विषय, गुण, टक्केवारी आणि इतर माहिती नीट तपासून पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra HSC Marksheet Date)

https://prahaar.in/2026/05/23/soft-cotton-saris-that-belong-in-every-summer-wardrobe/

जर गुणपत्रिकेमध्ये नावाची चूक, विषयातील त्रुटी किंवा गुणांबाबत कोणतीही तांत्रिक अडचण आढळल्यास विद्यार्थ्यांनी तात्काळ संबंधित महाविद्यालयाशी संपर्क साधावा. त्यानंतर शिक्षण मंडळाकडे दुरुस्तीसाठी आवश्यक प्रक्रिया करण्यात येणार आहे. (Maharashtra HSC Marksheet Date)

यंदा बारावीच्या निकालात उत्तीर्ण झालेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी ही घोषणा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण पुढील काही दिवसांत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया वेग घेणार असून, मूळ कागदपत्रांशिवाय प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. (Maharashtra HSC Marksheet Date)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here