अहिल्यानगर : मुंबईत गेल्या महिन्यात एकाच कुटुंबात चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. विशेष म्हणजे, कलिंगड आणि बिर्याणी खाल्ल्यानंतर या चौघांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त झळकल्याने खळबळ उडाली होती. अखेर, विषबाधा (Food poisioning) झाल्यानेच हा मृत्यू झाल्याचे पोलीस आणि फॉरेन्सिक तपासातून समोर आले आहे . आता, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगावला राहणार्या जायभाय कुटुंबातील सात जणांना आंब्याचा रस पिल्यानंतर विषबाधा झाल्याची घटना गेल्या रविवारी उघडकीस आली . जायभाय कुटुंबावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मते संबंधित कुटूंबीयांनी जे आंबे खाल्ले ते पिकवण्यासाठी ‘कॅल्शियम कार्बाइड’ चा वापर केलेला असू शकतो, असे सांगण्यात आले.
https://prahaar.in/2026/05/23/mumbai-ahmedabad-bullet-train-project-update-second-tbm-cutterhead-lowered-at-ghansoli-for-21-km-underground-tunnel/
यंदाचा उन्हाळा आता संपुष्टात येत असून शेवटच्या काही दिवसांत आंबे खाऊन जेवणातील गोडवा जपण्याचं काम खवय्यांकडून केलं जात आहे. सध्या आंब्याचा हंगाम सुरू असल्याने बाजारात विविध जातींचे आंबे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. शेवगाव शहरातील आरे वस्तीत राहणाऱ्या भाऊसाहेब जायभाय यांनीही बाजारातून आंबे खरेदी केले. कुटुंबातील सर्वांनी आंब्याचा रस पिला , त्यानंतर जायभाय कुटुंबातील सात जणांना चक्कर येणे, तोल जाणे असा त्रास सुरू झाला. नातेवाईकांनी सुरुवातीला सर्वांना शेवगावमधील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले, परंतु सर्वांची प्रकृती जास्तच बिघडल्याने त्यांना अहिल्यानगर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले .काही केमिकल्स पोटात गेल्याने अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो असे उपचार करणारे डॉ.सचिन पांडुळे यांनी सांगितले. दरम्यान, सात रुग्णापैकी सहा जणांना रुग्णालयातून वेगवेगळ्या दिवशी डिस्चार्ज देण्यात आला असून एकावर अजूनही उपचार सुरू आहे, मात्र सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
https://prahaar.in/2026/05/23/state-government-to-bring-policy-for-single-women/
केमिकलने पिकवलेल्या आंबा विक्रीच्या संशयावरून तपासणी: