ठाणे : ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्तरित्या राबवलेल्या मोठ्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये खोणी-पलावा परिसरातून २४ नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे पलावा सिटी परिसरात एकच खळबळ उडाली असून, या विदेशी नागरिकांचे अंमली पदार्थ तस्करीशी काही संबंध आहेत का, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. (24 Nigerians Arrested From Palava city)
ही मोठी कारवाई शनिवार २३ मे रोजी पहाटे ३ ते सकाळी १० वाजेदरम्यान करण्यात आली. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांच्या पथकांनी हायप्रोफाईल सोसायट्यांमध्ये एकाचवेळी छापेमारी करत विदेशी नागरिकांची कागदपत्रे, वास्तव्यासंबंधी माहिती आणि त्यांच्या हालचालींची पडताळणी केली. पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी याबाबत माहिती दिली. (24 Nigerians Arrested From Palava city)
मुंबई : अंमली पदार्थ तस्करीविरुद्धच्या एका मोठ्या कारवाईत, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागीय पथकाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय ...
पोलिसांच्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या २४ जणांमध्ये १४ पुरुष, ६ महिला आणि ४ लहान मुलांचा समावेश आहे. हे नागरिक मूळचे नायजेरियन असून त्यांचे संबंध दक्षिण आफ्रिकेतील घाना आणि युगांडा भागाशी असल्याची माहिती समोर आली आहे. चौकशीदरम्यान काही जणांकडे वैध कागदपत्रे आढळली, तर काही जणांकडे व्हिसा आणि पासपोर्ट नसल्याचे उघड झाले. (24 Nigerians Arrested From Palava city)
२४ पैकी ७ जणांकडे आवश्यक कागदपत्रे असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर ८ जणांकडे व्हिसा किंवा पासपोर्ट नव्हते. उर्वरित ९ जणांविरोधात न्यायालयात विविध खटले सुरू असल्याने त्यांचे पासपोर्ट न्यायालयात जमा असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, ताब्यात घेतलेल्या ९ जणांवर एनडीपीएस अर्थात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. (24 Nigerians Arrested From Palava city)
बिहार : प्रेम आंधळं असतं , असं म्हटलं जातं. प्रेमात कोण काय करेल काही सांगता येत नाही. बिहारच्या रोहतास जिल्ह्यात प्रेमप्रकरणाचे असेच खळबळजनक उदाहरण ...
दरम्यान, या ऑपरेशनदरम्यान एक नायजेरियन महिला पोलिसांपासून बचाव करण्यासाठी इमारतीवरून उडी मारून पळण्याचा प्रयत्न करत असल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रयत्नात ती जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची माहिती घेतल्यानंतर तिच्याविरोधातही पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (24 Nigerians Arrested From Palava city)
या छापेमारीदरम्यान नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ प्रकरणातील ‘मोस्ट वाँटेड’ नायजेरियन आरोपीलाही पकडण्यात यश आले. त्याला पुढील चौकशीसाठी नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. (24 Nigerians Arrested From Palava city)
सोलापूर : सोलापूर शहरात ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावाखाली मोठी सायबर फसवणूक उघडकीस आली आहे. फेसबुकवरील आकर्षक जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर एका टेक्स्टाईल ...
या संपूर्ण कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे, मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे, दोन सहाय्यक आयुक्त, २५ अधिकारी आणि तब्बल ८० पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. सध्या ताब्यात घेतलेल्या सर्व विदेशी नागरिकांची सखोल चौकशी सुरू असून त्यांच्या आर्थिक व्यवहारांपासून संपर्क जाळ्यापर्यंत सर्व बाबींची तपासणी केली जात आहे. (24 Nigerians Arrested From Palava city)





