कर्नाटक : कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात काल म्हणजेच शुक्रवार २२ मे रोजी मध्यरात्री भीषण रस्ता अपघात झाला. चित्तापूर तालुक्यातील लाडलापूर गावाजवळ भरधाव ट्रक आणि क्रूझर वाहनाची समोरासमोर जोरदार धडक होऊन एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघात इतका भीषण होता की क्रूझर वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला. (Karnataka Road Accident)
https://prahaar.in/2026/05/23/40000-jobs-in-shipbuilding-sector-by-2030-minister-nitesh-rane/
मिळालेल्या माहितीनुसार, इंगळगी गावातील एका आजारी नातेवाईकाला उपचारासाठी यादगीर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील उपचारानंतर कुटुंबीय रात्री उशिरा क्रूझर वाहनातून आपल्या गावाकडे परतत होते. त्याचवेळी लाडलापूर गावाजवळ समोरून वेगात येणाऱ्या ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. धडकेनंतर वाहन काही अंतर फरफटत गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. (Karnataka Road Accident)
https://prahaar.in/2026/05/23/nashik-demand-for-physical-pleasure-from-married-people/
दरम्यान, या भीषण अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक सुरळीत केली. या घटनेनंतर रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून रात्रीच्या वेळी होणाऱ्या अपघातांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. (Karnataka Road Accident)