Home देश Karnataka Road Accident : कर्नाटक हादरलं! कलबुर्गीत मृत्यूचा कहर; भरधाव ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील ५ जण ठार

Karnataka Road Accident : कर्नाटक हादरलं! कलबुर्गीत मृत्यूचा कहर; भरधाव ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील ५ जण ठार

0
Karnataka Road Accident : कर्नाटक हादरलं! कलबुर्गीत मृत्यूचा कहर; भरधाव ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील ५ जण ठार
Accident

कर्नाटक : कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात काल म्हणजेच शुक्रवार २२ मे रोजी मध्यरात्री भीषण रस्ता अपघात झाला. चित्तापूर तालुक्यातील लाडलापूर गावाजवळ भरधाव ट्रक आणि क्रूझर वाहनाची समोरासमोर जोरदार धडक होऊन एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघात इतका भीषण होता की क्रूझर वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला. (Karnataka Road Accident)

मृत सर्वजण चित्तापूर तालुक्यातील इंगळगी गावचे रहिवासी होते. मृतांची ओळख टोलू पाशा (२७), महिबूब (४५), हुसेनी बुड़ान शाहा (४८), रसूल बी (४२) आणि फातिमा (३८) अशी झाली आहे. हे सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याने गावावर शोककळा पसरली आहे. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतांच्या कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. (Karnataka Road Accident)

https://prahaar.in/2026/05/23/40000-jobs-in-shipbuilding-sector-by-2030-minister-nitesh-rane/

मिळालेल्या माहितीनुसार, इंगळगी गावातील एका आजारी नातेवाईकाला उपचारासाठी यादगीर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील उपचारानंतर कुटुंबीय रात्री उशिरा क्रूझर वाहनातून आपल्या गावाकडे परतत होते. त्याचवेळी लाडलापूर गावाजवळ समोरून वेगात येणाऱ्या ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. धडकेनंतर वाहन काही अंतर फरफटत गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. (Karnataka Road Accident)

अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मदतकार्य सुरू करत पोलिसांना माहिती दिली. मात्र वाहनाची अवस्था अत्यंत खराब झाल्याने आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. काही जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर काहींनी रुग्णालयात नेत असताना प्राण सोडले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Karnataka Road Accident)

https://prahaar.in/2026/05/23/nashik-demand-for-physical-pleasure-from-married-people/

घटनेची माहिती मिळताच वाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. तसेच ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. ट्रकचा वेग जास्त होता का, चालकाला डुलकी लागली होती का किंवा वाहनांमध्ये तांत्रिक बिघाड होता का याबाबत पोलिस चौकशी करत आहेत. (Karnataka Road Accident)

दरम्यान, या भीषण अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक सुरळीत केली. या घटनेनंतर रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून रात्रीच्या वेळी होणाऱ्या अपघातांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. (Karnataka Road Accident)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here