Home ब्रेकिंग न्यूज NEET Paper Leak Case : नीट पेपर फुटीचे लातूर पॅटर्न; लातूरमधून डॉ. मनोज शिरूरे यांना अटक

NEET Paper Leak Case : नीट पेपर फुटीचे लातूर पॅटर्न; लातूरमधून डॉ. मनोज शिरूरे यांना अटक

0
NEET Paper Leak Case : नीट पेपर फुटीचे लातूर पॅटर्न; लातूरमधून डॉ. मनोज शिरूरे यांना अटक
NEET Paper Leak Case

लातूर : देशभरात खळबळ उडवणाऱ्या नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणात सीबीआयने लातूरमध्ये आणखी एक मोठी कारवाई केली आहे. लातूरमधील बालरोग तज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांना अटक करण्यात आली असून, त्यांनी स्वतःच्या मुलासाठी परीक्षेपूर्वी फुटलेली नीट प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा गंभीर आरोप आहे. (NEET Paper Leak Case)

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. शिरुरे यांनी ही प्रश्नपत्रिका मोटेगावकर नावाच्या व्यक्तीकडून विकत घेतल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान सीबीआयने बुधवारी (२० मे) पुण्यात अनेक विद्यार्थ्यांच्या घरांवर धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर रात्री उशिरा लातूरमधून डॉ. मनोज शिरुरे यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशीनंतर सीबीआयने त्यांना अटक केली आहे. (NEET Paper Leak Case)

https://prahaar.in/2026/05/20/neet-paper-leak-case-municipal-corporation-takes-major-action-against-motegaonkar-rcc-class-in-pune-tax-dues-of-rs-3-20-crore-class-sealed/

डॉ. मनोज शिरुरे हे बालरोग तज्ज्ञ असून ते मूळचे लातूरचे रहिवशी आहेत. लातूरच्या जुना औसा रोड विभागात त्यांचं सिद्धिविनायक बाल रुग्णालय आहे. त्यांचं रुग्णालय चांगलं चालतं. नीट पेपरफुटीचं प्रकरण समोर आल्यानंतर गेल्या आठ दिवसापासून लातूरमध्ये सीबीआय तळ ठोकून आहे. सीबीआयने आधी मोटेगावकरांची कसून चौकशी केली आणि त्यानंतर त्याला अटक केली. त्यानंतर त्याच्याकडून सीबीआयने असंख्य माहिती मिळवली. त्याची कडी जोडत सीबीआय डॉ. शिरुरेपर्यंत पोहोचली. सीबीआयने काल संध्याकाळी शिरुरे यांच्या रुग्णालयावर छापा टाकला. त्यानंतर त्यांची साडे चार तास कसून चौकशी केली. त्यांना उलटे सुलटे प्रश्न विचारले. त्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली देताच सीबीआयने त्यांच्या मुसक्या आवळल्या. पालकांवर होणारी ही पहिलीच कारवाई असल्याने लातूरसह अख्खा महाराष्ट्र हादरून गेला आहे. (NEET Paper Leak Case)

https://prahaar.in/2026/05/20/neet-paper-leak-neet-paper-leak-case-has-repercussions-in-vidarbha-amravati-also-on-cbi-radar/

चौकशी सुरू असतानाच सीबीआयने शिरूरे यांच्याकडील मोबाईल जप्त केला. त्याने कुणाकुणाला संपर्क साधला होता. मोटेगावकरांशी कधीपासून संपर्कात होता आणि कुणा कुणाला नीटचे पेपर विकले का? किंवा व्हायरल केले का? याचा तपास सीबीआय करणार आहे. तसेच त्याच्या रुग्णालयातून सीबीायने महत्त्वाचे कागदपत्रेही जप्त केली आहे. सीबीआयकडून त्याचे बँक अकाऊंटही चेक केले जाणार आहेत. त्याने मोटेगावकरांशी आर्थिक व्यवहार केले होते का? केले होते तर कितीचे केले होते? याची माहिती सीबीआय गोळा करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (NEET Paper Leak Case)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here