Home क्राईम Pune Police : शरद पवार गटाच्या विकास लवांडेंना अटक

Pune Police : शरद पवार गटाच्या विकास लवांडेंना अटक

0
Pune Police : शरद पवार गटाच्या विकास लवांडेंना अटक
Vikas Lavande Arrested

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे. विकास लवांडे यांच्या विरोधात वारकरी संप्रदायात घुसखोरी सुरू असल्याचे वक्तव्य केल्याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्यांतर्गत त्यांना अटक झाल्याचे समजते. अद्याप पोलिसांनी या प्रकरणी अधिकृतरित्या माहिती दिलेली नाही.

https://prahaar.in/2026/05/21/bandra-encroachment-removal-campaign-stone-pelting-case-in-bandra-heats-up-police-arrest-16-people-from-garib-nagar/

विकास लवांडे यांनी अटक टाळण्यासाठी कोर्टात दाद मागितली होती. अटकपूर्व जामीन मिळवण्याची धडपड केली होती. पण कोर्टाने त्यांची अटकपूर्व जामीन अर्जाची विनंती फेटाळली होती. यानंतर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली. विकास लवांडे यांना अटक केली.

https://prahaar.in/2026/05/21/mumbai-bandras-garib-nagar-demolition-enters-day-3-railway-pushes-station-expansion-amid-tension-protests/

वारकरी संप्रदायाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न काही जण मुद्दाम करत आहेत. वारकऱ्यांविषयी समाजात आदराची भावना आहे. पण प्रतिमा मलिन करून समाजात तणाव निर्माण करण्याचा काहींचा राजकीय हेतू आहे. हा हेतू साध्य करण्यासाठी विना पुरावा बिनबुडाची वक्तव्ये करण्याचे प्रकार सुरू असल्याची चर्चा सोशल मीडियात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायात घुसखोरी सुरू असल्याचे वक्तव्य करणाऱ्या विकास लवांडेंना अटक झाली आहे. या प्रकरणात पुढे काय होणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here