इराण युद्धाच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील मतभेद आता उघडपणे समोर येताना दिसत आहेत. अमेरिकन माध्यमांच्या वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald trump) आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Prime Minister Benjamin Netanyahu) यांच्यात इराणविरोधातील पुढील रणनीतीवरून तणावपूर्ण दूरध्वनीवर चर्चा झाली. इस्रायलला इराणवर पुन्हा लष्करी हल्ले करायचे आहेत, तर अमेरिका सध्या करार आणि राजनैतिक तोडग्याच्या दिशेने पुढे जाण्याच्या भूमिकेत असल्याचे सांगितले जात आहे. (Iran – America War)
https://prahaar.in/2026/05/21/bandra-encroachment-removal-campaign-stone-pelting-case-in-bandra-heats-up-police-arrest-16-people-from-garib-nagar/
वृत्तानुसार, ट्रम्प यांनी रविवारी इराणवर प्रस्तावित हल्ले पुढे ढकलले होते. कतार, यूएई आणि इतर अरब देशांच्या विनंतीनंतर अमेरिकेने लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर कतार आणि पाकिस्तानने इतर प्रादेशिक मध्यस्थ देशांसह मिळून सुधारित शांतता प्रस्ताव तयार केला, जेणेकरून अमेरिका आणि इराणमधील मतभेद कमी करता येतील. (Iran – America War)
https://prahaar.in/2026/05/21/weather-update-imd-alert-the-next-15-hours-are-dangerous-thunderstorms-in-17-states-while-heatwave-in-north-india/
https://prahaar.in/2026/05/21/mumbai-bandras-garib-nagar-demolition-enters-day-3-railway-pushes-station-expansion-amid-tension-protests/