– सुनेत्रा आणि पार्थ पवार यांच्यासोबत बैठक; १ जूनपासून काम सुरू करणार
मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा भक्कमपणे उभे करण्यासाठी पक्षाच्या नव्या नेतृत्वाने मोठे पाऊल उचलले आहे. ‘डिझाईन बॉक्स’ या संस्थेने काम थांबवल्यानंतर, आता प्रशांत किशोर (पीके) राष्ट्रवादीचे नवे राजकीय रणनीतीकार म्हणून धुरा सांभाळणार आहेत. मंगळवारी, १९ मे रोजी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, खासदार पार्थ पवार यांच्यासोबत प्रशांत किशोर यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. १ जूनपासून प्रशांत किशोर आणि त्यांची कंपनी राष्ट्रवादीच्या ब्रँडिंग व रणनीतीचे काम अधिकृतपणे हाती घेणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.
https://prahaar.in/2026/05/19/sunil-tatkare-met-the-chief-minister-devendra-fadnavis/
प्रशांत किशोर हे देशातील एक अग्रगण्य राजकीय रणनीतीकार आणि बिहारमधील ‘जन सुराज पक्षा’चे संस्थापक आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी राबवलेली ‘चाय पे चर्चा’ आणि यशस्वी प्रचार मोहीम देशभरात प्रचंड गाजली होती. त्यानंतर त्यांनी बिहारमध्ये नितीश कुमार, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशात वाय. एस. जगनमोहन रेड्डी, तामिळनाडूत एम. के. स्टॅलिन आणि दिल्लीत आम आदमी पार्टी (आप) यांसारख्या प्रादेशिक पक्षांना सत्तेत आणण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
https://prahaar.in/2026/05/19/share-market-strong-rise-in-the-stock-market-sensex-close-to-300-points-nifty-also-increased/
नरेश अरोरांनी काम थांबवले :
https://prahaar.in/2026/05/19/uttarakhand-train-accident-a-major-train-accident-was-averted-in-rishikesh-3-coaches-of-ujjain-express-derailed/