वॉशिंग्टन : कॅलिफोर्नियातील सॅन दिएगो येथील इस्लामिक सेंटर कॅम्पसमधील मशिदीजवळ सोमवारी झालेल्या गोळीबारात तीन जण ठार झाले. हा हल्ला दोन अल्पवयीन बंदूकधाऱ्यांनी केल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर त्यांनी जवळच्याच रस्त्यावर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. माहिती मिळाल्यानंतर पोलीस इस्लामिक सेंटरमध्ये दाखल झाले आणि त्यांनी रहिवाशांना काही काळासाठी घरातच थांबण्याचा सल्ला दिला. सॅन दिएगोचे पोलीस प्रमुख स्कॉट वॉल यांनी या घटनेला दुजोरा दिला. (Shooting at Islamic center in US)
- एन विभागातील उद्यान कामांचा महापौर रितू तावडे यांनी घेतला आढावा मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील उद्याने ही मुंबईकरांच्या विश्रांतीची, मनोरंजनाची ...
सॅन दिएगोचे पोलीस प्रमुख स्कॉट वॉल यांनी सांगितले की, हल्ल्याची पहिली माहिती सकाळी ११:४३ च्या सुमारास मिळाली. घटनेच्या दोन तास आधी, एका महिलेने तिचा मुलगा हरवल्याची तक्रार केली. तिने सांगितले की, त्याच्याकडे अनेक शस्त्रे होती. त्याची गाडीही गायब होती. त्यांनी सांगितले की, इस्लामिक सेंटरला कोणत्याही प्रकारची धमकी मिळाली नव्हती. या घटनेचा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. इस्लामिक सेंटरचे इमाम, ताहा यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, संपूर्ण मुस्लिम समाज शोकसागरात बुडाला आहे. ते म्हणाले, "अशी घटना घडेल अशी आम्ही कधीच अपेक्षा केली नव्हती." (Shooting at Islamic center in US)
- खासगी सहभाग तत्वावर रुग्णालयांमध्ये ब्लड बँककरता संस्थांची निवड मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये रक्त ...
A shooting has taken place at the largest Islamic center in San Diego, USA Three people were killed, including a security guard. Five others were injured. According to police, the attack is being treated as a hate crime. Anti-Islamic graffiti and a note containing racist… pic.twitter.com/8Yd00E3nUh
— NEXTA (@nexta_tv) May 19, 2026
- भाडेकरार करण्याचा प्रस्ताव सुधार समितीत सादर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्यावतीने खासगी सहभाग तत्वावर देण्यात आलेले मरोळ येथील ...






