– एन विभागातील उद्यान कामांचा महापौर रितू तावडे यांनी घेतला आढावा
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबईतील उद्याने ही मुंबईकरांच्या विश्रांतीची, मनोरंजनाची हक्काची ठिकाणे आहेत. चालणे, धावणे, व्यायाम, योगा आदींच्या माध्यमातून उद्याने, मैदाने ही सार्वजनिक आरोग्यासाठी महत्त्वाची आहेत. उद्यानांचा विकास आणि पुनर्विकास करताना स्थानिक नागरिकांच्या सूचना आणि संकल्पना लक्षात घेऊन विकास करणे आवश्यक आहे. त्यादिशेने प्रशासनाने पावले उचलावीत. सर्व नगरसेवकांनी देखील आपापल्या परिसरातील उद्याने, मैदाने यांच्या विकासामध्ये लोकसहभाग रहावा, यासाठी प्रयत्न करावेत, असे उद्गार मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी काढले. घाटकोपर एन विभागातील उद्याने विकासाच्या संकल्पना आणि आराखडे तयार करून लवकरात लवकर सादर करावेत, असे निर्देशही महापौर तावडे यांनी दिले आहेत.
https://prahaar.in/2026/05/19/seven-hills-hospital-news-seven-hills-hospital-is-again-under-the-control-of-a-private-organization/
एन’ विभाग हद्दीतील विविध उद्याने तसेच मैदाने यांचा विकास करण्याच्या अनुषंगाने घाटकोपर स्थित एन विभाग प्रशासकीय कार्यालयात, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार १८ मे २०२६ रोजी बैठक पार पडली. त्यावेळी महापौरांनी विविध निर्देश दिले.
https://prahaar.in/2026/05/19/bmc-news-blood-banks-in-5-municipal-hospitals-in-the-suburbs/
एन विभागातील प्रस्तावित उद्याने व मैदाने विकासांबाबत सर्व संबंधित नागरिकांच्या सूचना, मुद्दे तसेच संकल्पना त्याचप्रमाणे सद्यस्थितीत नागरिकांना येणाऱया अडचणी यांची माहिती महापौरांनी तपशिलवारपणे जाणून घेतली. वेगवेगळ्या संकल्पना आधारित उद्यानांची निर्मिती करणे, उद्यानांना चांगले व आकर्षक प्रवेशद्वार असावेत, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहे, पुरेशी प्रकाश व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यवस्था, चालण्यासाठी तसेच धावण्यासाठी पथ (वॉकिंग / जॉगिंग ट्रॅक), मुलांसाठी खेळणी, उद्याने खुली राखण्याचा कालावधी वाढवणे, सुरक्षारक्षकांची नेमणूक, सीसीटीव्ही लावणे, उद्याने व मैदाने परिसरांमधील अतिक्रमणे हटविणे, मैदाने समतल राखणे, मैदानांमध्ये धूळ प्रतिबंधक उपाययोजना करणे यासह विविध सूचना स्थानिक नागरिकांनी मांडल्या.
