Home देश Uttarakhand Train Accident : ऋषिकेशमध्ये मोठा रेल्वे अपघात टळला! उज्जयनी एक्सप्रेसचे ३ डब्बे रुळावरून घसरले

Uttarakhand Train Accident : ऋषिकेशमध्ये मोठा रेल्वे अपघात टळला! उज्जयनी एक्सप्रेसचे ३ डब्बे रुळावरून घसरले

0
Uttarakhand Train Accident : ऋषिकेशमध्ये मोठा रेल्वे अपघात टळला! उज्जयनी एक्सप्रेसचे ३ डब्बे रुळावरून घसरले
train accident

ऋषिकेश : उत्तराखंडमधील ऋषिकेश (Uttarakhand Train Accident) येथे उज्जयनी एक्सप्रेसशी संबंधित धक्कादायक घटना समोर आली आहे. स्टेशन यार्डमध्ये शंटिंग सुरू असताना उज्जयनी एक्सप्रेस अचानक अनियंत्रित झाली आणि इंजिनासह काही डबे भिंत तोडून रुळावरून घसरले. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना ऋषिकेशमधील खंड गाव परिसरात घडली. गाडी क्रमांक १४३१७ उज्जयनी एक्सप्रेसची रात्री शंटिंग प्रक्रिया सुरू होती. त्याचवेळी ट्रेन अचानक वेगाने पुढे सरकली आणि थेट भिंतीवर जाऊन आदळली. धडकेनंतर इंजिन आणि काही चाके रुळावरून घसरल्याची माहिती समोर आली आहे. (Uttarakhand Train Accident)

https://prahaar.in/2026/05/19/supreme-court-to-deliver-verdict-today-on-stray-dog-menace-responsibility-in-bite-cases/

सुदैवाने अपघाताच्या वेळी ट्रेन पूर्णपणे रिकामी होती. कोणताही प्रवासी किंवा रेल्वे कर्मचारी डब्यांमध्ये नसल्याने मोठी जीवितहानी टळली. त्यामुळे एक मोठी दुर्घटना होण्यापासून बचाव झाला. (Uttarakhand Train Accident)

प्राथमिक तपासात ब्रेक प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अपघातानंतर रेल्वे अधिकारी, तांत्रिक पथक आणि आरपीएफचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली असून रुळांवरील वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. (Uttarakhand Train Accident)

https://prahaar.in/2026/05/19/actor-govinda-event-bouncer-paparazzi-fight-viral-video-viral-actor-take-action/

वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक महेश यादव यांनी सांगितले की, इंजिनची चाके रुळावरून घसरली असून नेमकं कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे. तर आरपीएफ अधीक्षक सरोज कुमार यांनी सांगितले की, ट्रेन सकाळी सहा वाजता सुटणार होती आणि त्यापूर्वी नियमित शंटिंग सुरू होते. रात्री सुमारे दहा वाजता या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. (Uttarakhand Train Accident)

या घटनेमुळे रेल्वेच्या तांत्रिक देखभाल आणि सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वेळेत परिस्थिती नियंत्रणात आल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी रेल्वे प्रशासनाने याप्रकरणी गंभीर दखल घेतली आहे. (Uttarakhand Train Accident)

https://prahaar.in/2026/05/19/shocking-attempted-rape-of-minor-girl-in-karjat-crime-under-pocso-against-father/

दरम्यान, या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांकडून रेल्वे सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. (Uttarakhand Train Accident)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here