– गुंतवणूकदारांचे लक्ष बाजाराकडे
मुंबई : तुम्ही चांदीमध्ये (Silver Price) गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात किंवा दागिन्यांची खरेदी करण्याची तयारी करत आहात? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. भारत सरकारने चांदीच्या आयातीसंदर्भात मोठा निर्णय घेतला असून, त्याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारातील चांदीच्या किमतींवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही महिन्यांत चांदीचे दर आणखी वाढू शकतात.
https://prahaar.in/2026/05/18/air-india-services-collapse-in-mumbai-stranded-passengers-outraged/
केंद्र सरकारने यापूर्वी सोन्यावरील आयात शुल्क वाढवले होते आणि ड्युटी-फ्री मर्यादांमध्ये बदल केले होते. आता चांदीबाबतही (Silver Price) कठोर पावले उचलण्यात आल्याने मौल्यवान धातूंच्या बाजारात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
या निर्णयामागे देशावरील वाढता आयात खर्च हे प्रमुख कारण मानले जात आहे. मध्य-पूर्वेतील तणाव, डॉलरची वाढती ताकद आणि रुपयाची घसरण यामुळे भारताच्या आयात बिलात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सरकार परकीय चलन साठ्यावरचा दबाव कमी करण्यासाठी आयात नियंत्रणाचे धोरण अवलंबत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. (Silver Price)
https://prahaar.in/2026/05/18/nitesh-rane-construction-of-a-fishing-jetty-in-burundi-is-gaining-momentum-dapolis-fisheries-will-get-new-strength-minister-nitesh-rane/
एप्रिल २०२६ मध्ये चांदीच्या आयातीत (Silver Price) १५७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. गेल्या वर्षी याच काळात आयातीचे मूल्य ४११ दशलक्ष डॉलर होते. भारत मुख्यतः संयुक्त अरब अमिराती (UAE), युनायटेड किंगडम (UK) आणि चीनमधून मोठ्या प्रमाणावर चांदी आयात करतो.
LKP सिक्युरिटीजचे कमोडिटी आणि करन्सी रिसर्च तज्ज्ञ जतीन त्रिवेदी (Jatin Trivedi) यांनी स्पष्ट केले की, “सरकारने चांदीची आयात (Silver Price) पूर्णपणे बंद केलेली नाही. मात्र आता आयात प्रक्रिया अधिक नियंत्रित करण्यात आली आहे.”
https://prahaar.in/2026/05/18/uttar-pradesh-cm-yogi-adityanath-on-namaz-on-roads-says-if-you-want-do-namaz-do-so-in-shifts/
त्यांच्या मते, आता चांदीची आयात फक्त खालील माध्यमांतूनच केली जाऊ शकते:
– आरबीआयशी संलग्न बँका
– डीजीएफटी (DGFT) मान्यताप्राप्त संस्था
– बुलियन एक्सचेंजशी जोडलेल्या अधिकृत एजन्सीज
तथापि, आंतरराष्ट्रीय बाजारावर या निर्णयाचा फारसा परिणाम होणार नसल्याचे जाणकारांचे मत आहे. भारत हा चांदीचा मोठा ग्राहक असला तरी जागतिक किमती ठरवणारा प्रमुख घटक नाही. (Silver Price)
https://prahaar.in/2026/05/18/uddhav-thackeray-ubatha-chiefs-dandi-in-the-legislative-council-attendance-only-42-days-in-4-years-shameful-record-of-lowest-attendance-in-the-history-of-the-house/
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सरकारचे हे पाऊल केवळ चांदीपुरते (Silver Price) मर्यादित नाही. परकीय चलन साठा सुरक्षित ठेवणे, डॉलरचा बाहेर जाणारा प्रवाह कमी करणे आणि आयात नियंत्रणात ठेवणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
सध्या भारतातील चांदीचे दर पुढीलप्रमाणे आहेत :
१ किलो चांदी – ₹२.८० लाख
१०० ग्रॅम – ₹२८,०००
१० ग्रॅम – ₹२,८००
१ ग्रॅम – ₹२८०
विशेष म्हणजे, मे २०२६ महिन्यात आतापर्यंत चांदीच्या किमतींमध्ये (Silver Price) जवळपास १० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी काळात चांदीत गुंतवणूक करावी की थांबावे, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.