Home ब्रेकिंग न्यूज Nitesh Rane : इंधन बचतीसाठी मंत्री नितेश राणे यांचा मेट्रोने प्रवास

Nitesh Rane : इंधन बचतीसाठी मंत्री नितेश राणे यांचा मेट्रोने प्रवास

0
Nitesh Rane : इंधन बचतीसाठी मंत्री नितेश राणे यांचा मेट्रोने प्रवास
Nitesh Rane Metro travelling

मुंबई : जागतिक इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी पुन्हा एकदा इंधन बचतीसाठी पुढाकार घेतला. आपल्या विभागाच्या नियोजित बैठकांना उपस्थित राहण्यासाठी मंत्री राणे यांनी मुंबई मेट्रोने प्रवास करत मंत्रालय गाठले.

https://prahaar.in/2026/05/18/will-st-travel-become-expensive/

नितेश राणे यांनी मुंबई अंतर्देशीय विमानतळ टी-१ मेट्रो स्टेशन ते चर्चगेट मेट्रो स्टेशन दरम्यान सर्वसामान्य मुंबईकरांसोबत मेट्रोने प्रवास केला. इंधन बचतीसाठी त्यांनी आपल्या शासकीय गाड्यांचा ताफा बाजूला ठेवून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणे पसंत केले. एका कॅबिनेट मंत्र्याने सुरक्षेचा कोणताही बडेजाव न बाळगता मेट्रोने प्रवास केल्याने प्रवाशांनीही कौतुक करीत त्यांच्यासोबत सेल्फी काढले. दरम्यान, चर्चगेट स्थानकात उतरल्यानंतरही त्यांनी पायी मंत्रालय गाठले.

गेल्या आठवड्यात १४ मे रोजी मंत्री नितेश राणे यांनी ‘सुवर्णगड’ या आपल्या शासकीय निवासस्थानापासून ते मंत्रालयापर्यंत पायी प्रवास केला होता. राणे यांनी यापूर्वीच आपल्या मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास विभागाच्या सर्व प्रशासकीय बैठका ‘ऑनलाइन’ पद्धतीने घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांचा प्रवासाचा खर्च आणि वेळ वाचत आहे. आता स्वतः मंत्र्यांनीच मेट्रोने प्रवास करून प्रशासनासमोर आणि नागरिकांसमोर आदर्श ठेवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here