नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी स्वीडनमधील गॉथेनबर्ग येथे पंतप्रधान महामहीम उल्फ क्रिस्टरसन यांच्यासोबत द्विपक्षीय (India – Sweden Bilateral Talks) चर्चा केली. स्वीडनच्या राजकुमारी क्राउन प्रिन्सेस व्हिक्टोरिया यांनीही या बैठकीत भाग घेतला आणि महामहीम राजे कार्ल सोळावे गुस्ताफ आणि राणी सिल्व्हिया यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी महामहीम राजांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
https://prahaar.in/2026/05/18/minister-nitesh-rane-travels-by-metro-to-save-fuel/
भारत-स्वीडन नातेसंबंध (India – Sweden Bilateral Talks) धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले. ही धोरणात्मक भागीदारी स्थैर्य आणि सुरक्षेसाठी धोरणात्मक संवाद; पुढील पिढीची आर्थिक भागीदारी; उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि विश्वासार्ह संपर्कव्यवस्था; आणि उद्याच्या भविष्याला एकत्र आकार देणे – लोक, ग्रह, आरोग्य आणि लवचिकता या चार स्तंभांद्वारे मार्गदर्शित असेल. या धोरणात्मक भागीदारीची अंमलबजावणी करण्यासाठी, राजकीय, आर्थिक, तांत्रिक, सुरक्षा, हवामान आणि दोन्ही देशांतील जनतेमधील परस्पर संबंधांच्या क्षेत्रातील सहकार्यासाठी एक व्यापक आराखडा प्रदान करणाऱ्या, ‘भारत-स्वीडन संयुक्त कृती योजना २०२६ – २०३०’ (India-Sweden Joint Action Plan 2026-2030) चा दोन्ही नेत्यांनी स्वीकार केला.
https://prahaar.in/2026/05/18/will-st-travel-become-expensive/
पंतप्रधान मोदी (India – Sweden Bilateral Talks) यांनी नवोन्मेष, स्वच्छ तंत्रज्ञान, प्रगत उत्पादन, शाश्वत गतिशीलता आणि डिजिटल परिवर्तनासह धोरणात्मक क्षेत्रांमध्ये स्वीडनने भारतासोबत सातत्याने ठेवलेल्या संपर्काचे कौतुक केले. स्वीडनचे पंतप्रधान क्रिस्टरसन यांनी डिजिटल परिवर्तन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात भारताने घेतलेल्या गरुडझेपेचे कौतुक केले. स्वीडनची अर्थव्यवस्था आणि नवोन्मेष परिसंस्थेमध्ये भारतीय समुदायाच्या सकारात्मक योगदानाचाही त्यांनी प्रामुख्याने उल्लेख केला. पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या विकास प्रवासात स्वीडनला आणखी मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आमंत्रण दिले.
v
Jeg har landet i Oslo i Norge. Jeg er takknemlig for den varme velkomsten fra statsminister Jonas Gahr Støre på flyplassen. Dette er det første besøket av en indisk statsminister til Norge på over 40 år. Jeg er sikker på at besøket vil styrke vennskapet mellom India og Norge.
Jeg… pic.twitter.com/FTwpaWbLnT— Narendra Modi (@narendramodi) May 18, 2026
https://prahaar.in/2026/05/18/italian-open-2026-jannik-sinner-jannik-sinner-becomes-the-winner-of-the-italian-open-equals-novak-djokovics-record/