– आज विशेष न्यायालयात हजर होणार
लातूर : देशभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी आणि निर्णायक कारवाई केली आहे. या प्रकरणातील संशयित प्रो. शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने ताब्यात घेतले असून, आज त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. (NEET Paper Leak Case)
https://prahaar.in/2026/05/18/sunetra-pawar-calls-executive-meeting-to-quell-discontent-within-ncp/
सीबीआयच्या या पावलामुळे आता तपासाला वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपास यंत्रणांना या रॅकेटमधील इतर महत्त्वाच्या व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी मोठे धागेदोरे मिळू शकतात, अशी चर्चा सुरू आहे. विशेषतः पेपरफुटीच्या संपूर्ण नेटवर्कमध्ये कोचिंग सेंटर, एजंट आणि इतर मध्यस्थांचा सहभाग होता का, याचाही तपास केला जात आहे. (NEET Paper Leak Case)
https://prahaar.in/2026/05/18/uttar-pradesh-road-accident-10-people-killed-in-truck-magic-collision-in-uttar-pradesh/
नीट पेपरफुटी प्रकरण सुरुवातीपासूनच राष्ट्रीय पातळीवर चर्चेत राहिले आहे. परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अनेक राज्यांमध्ये आंदोलनही करण्यात आले होते. त्यानंतर केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. (NEET Paper Leak Case)
लातूर हे शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. त्यामुळे या प्रकरणात लातूरचे नाव पुढे आल्याने राज्याच्या शैक्षणिक प्रतिमेलाही धक्का बसला आहे. “लातूर पॅटर्न” म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिक्षण व्यवस्थेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (NEET Paper Leak Case)
https://prahaar.in/2026/05/18/marathi-culture-shines-on-cannes-red-carpet-ashok-and-nivedita-sarafs-special-look/
आता सर्वांचे लक्ष विशेष न्यायालयाच्या सुनावणीकडे लागले असून, मोटेगावकर यांच्या चौकशीतून आणखी कोणती नावे समोर येणार आणि या देशव्यापी रॅकेटमागील मोठे मासे कोण आहेत, याबाबत उत्सुकता वाढली आहे. (NEET Paper Leak Case)