Home ब्रेकिंग न्यूज Sunetra Pawar : राष्ट्रवादीतील नाराजीनाट्य शमवण्यासाठी सुनेत्रा पवारांनी बोलावली कार्यकारिणीची बैठक

Sunetra Pawar : राष्ट्रवादीतील नाराजीनाट्य शमवण्यासाठी सुनेत्रा पवारांनी बोलावली कार्यकारिणीची बैठक

Sunetra Pawar : राष्ट्रवादीतील नाराजीनाट्य शमवण्यासाठी सुनेत्रा पवारांनी बोलावली कार्यकारिणीची बैठक

वरिष्ठ नेत्यांमधील विसंवाद दूर करणार; आमदारांशी साधणार व्यक्तिगत संपर्क

मुंबई : दिवंगत अजित पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेले नाराजीनाट्य आणि आमदारांमधील वाढती अस्वस्थता दूर करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार अखेर ॲक्शन मोडमध्ये आल्या आहेत. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रांमधील घोळ आणि ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल व सुनील तटकरे यांना साईडलाईन केल्याच्या चर्चेमुळे पक्षात मोठे बंड होण्याची चिन्हे आहेत. हे नाराजीनाट्य वेळेत शमवण्यासाठी उपमुMumख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने पक्षाच्या कोअर कमिटीची आणि राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ज्येष्ठ नेत्यांमधील विसंवाद आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार असून, सुनेत्रा पवार स्वतः सर्व आमदारांशी व्यक्तिगत संपर्क साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणार आहेत.

https://prahaar.in/2026/05/18/neet-paper-leak-case-big-stir-in-neet-paper-leak-case-prof-motegaonkar-on-cbis-radar-again/

अजितदादांच्या पश्चात सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी पक्षाची सर्व सूत्रे हाती घेतली असली, तरी निर्णय प्रक्रियेवरून पक्षात उभी फूट पडल्याचे चित्र आहे. निवडणूक आयोगासोबत सुरू असलेला पत्रप्रपंच थेट पार्थ पवार हाताळत असल्याची चर्चा आमदारांमध्ये सुरू आहे. “सुनेत्रा वहिनींची सही आणि पार्थ पवारांची शाई” अशा पद्धतीने सध्या पक्षाचा कारभार सुरू असून सुनेत्रा पवार मुलाला रोखू शकत नसल्याने पक्षात संभ्रम वाढला आहे. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांसारखे दिल्ली दरबारी वजन असलेले नेते जर सोबत नसतील, तर पक्षाचे भविष्यच अंधारात येईल, अशी भीती आमदारांना सतावत आहे.

https://prahaar.in/2026/05/18/jammu-kashmir-drug-case-after-punjab-jammu-and-kashmir-is-now-the-new-hotspot-of-drugs-more-than-1-3-lakh-youth-are-addicted-to-drugs/

आमदार संभ्रमात