Home ब्रेकिंग न्यूज MLC : विधानपरिषदेच्या १० नवनिर्वाचित आमदारांचा उद्या शपथविधी

MLC : विधानपरिषदेच्या १० नवनिर्वाचित आमदारांचा उद्या शपथविधी

0
MLC : विधानपरिषदेच्या १० नवनिर्वाचित आमदारांचा उद्या शपथविधी
Legislative Council Elections

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले नऊ आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेले एक, अशा एकूण १० नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा गुरुवार, १४ मे रोजी सकाळी ११ वाजता विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात पार पडणार आहे. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे या सर्व सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देतील.या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहतील.

शपथ घेणारे आमदार
१) डॉ. नीलम गोऱ्हे – शिवसेना
२) बच्चू कडू – शिवसेना
३) अंबादास दानवे – उबाठा
४) डॉ. प्रज्ञा सातव – भाजप
५) प्रमोद जठार – भाजप
६) झीशान सिद्दीकी – राष्ट्रवादी
७) माधवी नाईक – भाजप
८) सुनील कर्जतकर – भाजप
९) विवेक कोल्हे – भाजप
१०) संजय भेंडे – भाजप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here