Home क्रीडा South Africa : वर्ल्ड कप खेळण्यासाठी दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती घेतली मागे, टी- २० वर्ल्ड कप खेळणार

South Africa : वर्ल्ड कप खेळण्यासाठी दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती घेतली मागे, टी- २० वर्ल्ड कप खेळणार

0
South Africa : वर्ल्ड कप खेळण्यासाठी दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती घेतली मागे, टी- २० वर्ल्ड कप खेळणार

लंडन : टी-२० महिला वर्ल्ड कप २०२६ इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेची सुरुवात १२ जूनपासून होणार आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या देशांनी आपापले प्रत्येकी १५ खेळाडूंचे संघ जाहीर केले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या संघाची नुकतीच झाली. या संघात एका अशा खेळाडूचा समावेश आहे जिनं काही दिवसांपूर्वीच निवृत्ती रद्द केल्याचे जाहीर केले होते. ही खेळाडू आहे शबनिम इस्माईल.

शबनिम इस्माईलने आधी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. पण वर्ल्डकपच्या आधी तिनं निवृत्तीचा निर्णय रद्द करत पुन्हा खेळण्यासाठी सज्ज असल्याचे जाहीर केले होते. काही जवळच्या लोकांनी आणि दक्षिण आफ्रिका संघाचे मुख्य प्रशिक्षक मंडला माशिम्बी यांच्या प्रोत्साहनामुळेच हा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले. देशासाठी खेळणे हा सन्मान आहे आणि संघात निवड झाल्यामुळे मला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार असल्याचे आणि त्यासाठी प्रचंड आनंद होत असल्याचे ती म्हणाली.शबनिम ही ३७ वर्षांची आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी तिने एकदिवसीय आणि टी-२० फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. तिने १२७ एकदिवसीय सामन्यात १९१ विकेट्स घेतल्या आहेत तसेच टी-२० मध्ये ११३ सामन्यात १२३ विकेट्स घेतल्या आहेत.वर्ल्डकपसाठी दक्षिण अफ्रिका संघाचे नेतृत्व लॉरा वॉल्वार्ट करणार आहे. संघाचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे.

https://prahaar.in/2026/05/12/ipl-2026-the-playoff-race-has-intensified-in-ipl-2026-lets-know-how-many-points-each-team-needs/

दक्षिण आफ्रिकेचा संघ – लॉरा वॉल्वार्ट (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, नदिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसेन, शबनिम इस्माईल, सिनालो जाफ्ता, मारिझान कॅप, अयाबोंगा खाका, सुने लुस, काराबो मेसो, नॉनकुलुलेको म्लाबा, कायला रेनेके, तुमी सेखुखुने, डेन व्हॅन निकर्क.

आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ मधील दक्षिण आफ्रिकेचे साखळी सामने-
विरुद्ध ऑस्ट्रेलिया, १३ जून, मँचेस्टर
विरुद्ध पाकिस्तान, १७ जून, बर्मिंघम
विरुद्ध भारत, २१ जून, मँचेस्टर
विरुद्ध नेदरलॅंड्स, २५ जून, ब्रिस्टल
विरुद्ध बांग्लादेश, २८ जून, लॉर्ड्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here