Home ब्रेकिंग न्यूज Nitesh Rane : इंधन बचतीसाठी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विभागाचा पुढाकार

Nitesh Rane : इंधन बचतीसाठी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विभागाचा पुढाकार

0
Nitesh Rane : इंधन बचतीसाठी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विभागाचा पुढाकार
Fisheries, Ports Development

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मंत्री नितेश राणेंचा मोठा निर्णय

मुंबई : जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या इंधन संकटामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिलेल्या सूचनेनुसार, मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आपल्या विभागासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले असून, विभागाच्या सर्व बैठका आता ‘ऑनलाइन’ पद्धतीने घेण्याचे निर्देश दिले आहेत.

https://prahaar.in/2026/05/12/big-news-neet-2026-exam-cancelled/

इंधनावरील खर्च कमी करणे आणि परकीय चलनाची बचत करणे या हेतूने मंत्री नितेश राणे यांनी हा निर्णय घेतला आहे. या नव्या निर्णयानुसार, मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विभागाच्या मुंबईतील मंत्रालय किंवा इतर ठिकाणच्या बैठकांसाठी अधिकाऱ्यांना प्रवास करावा लागणार नाही. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कामकाज उरकण्यावर भर दिला जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी विभागात तातडीने सुरू करण्यात आली असून, यामुळे इंधन बचतीसोबतच प्रशासकीय कामाचा वेगही वाढणार आहे.

इलेक्ट्रिक वाहनांवर भर

त्याशिवाय पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी विभागात जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनांचा (ईव्ही) वापर करण्याच्या सूचनाही नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. “ऊर्जा बचत हे राष्ट्रीय कर्तव्य असून पर्यावरणाचे रक्षण आणि देशाची आर्थिक स्थिती संतुलित राखण्यासाठी प्रत्येक विभागाने अशी पावले उचलणे गरजेचे आहे,” असे मत राणे यांनी यावेळी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here