निवडणूक आयोगाकडून हालचालींना वेग; स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांची अट पूर्ण झाल्याने मार्ग मोकळा
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आता विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठीच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून येणाऱ्या विधान परिषदेच्या १७ रिक्त जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक प्रक्रिया जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी या निवडणुका पार पडल्यास वरिष्ठ सभागृहातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे आहेत.
https://prahaar.in/2026/05/12/deputy-chief-minister-eknath-shinde-praises-himanta-biswa-sarmas-leadership/
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे अनेक मतदारसंघांतील विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपूनही निवडणुका घेता आल्या नव्हत्या. नियमानुसार, संबंधित मतदारसंघात किमान ७५ टक्के मतदार (नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य इ.) उपलब्ध असणे आवश्यक असते. आता निवडणुका पार पडल्याने ही कायदेशीर अट पूर्ण झाली असून, निवडणूक आयोगाकडून लवकरच अधिकृत कार्यक्रम जाहीर केला जाण्याची चिन्हे आहेत.
या जिल्ह्यांत होणार रणसंग्राम
- पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर
- अहिल्यानगर, सोलापूर, जळगाव, पुणे
- सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, भंडारा-गोंदिया
- रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली
- परभणी-हिंगोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड आणि छत्रपती संभाजीनगर-जालना.
https://prahaar.in/2026/05/12/ncps-new-executive-committee/
राजकीय गणिते बदलणार!