– दहिसर नदी पुनरुज्जीवन, सौंदर्यीकरण प्रकल्प (टप्पा १) कामाचे लोकार्पण
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
नदी स्वच्छतेसाठी फक्त मुबंई महानगरपालिकेचे प्रयत्न पुरेसे नाहीत, नागरिकांनीही या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यायला हवा. नदीत कचरा टाकणे जेव्हा बंद होईल, तेव्हाच दहिसर नदी स्वच्छतेचे जनआंदोलन यशस्वी होईल. दहिसर नदीच्या आगामी टप्प्यातील सौंदर्यीकरणाच्या कामामुळे याठिकाणी पर्यटनाला वाव मिळावा. तसेच दहिसर नदीचा एसटीपी प्रकल्प देशात रोल मॉडेल ठरावा, असे वक्तव्य केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केले.
दहिसर नदी पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरण प्रकल्प (टप्पा १) चे लोकार्पण केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या शुभहस्ते दहिसर येथे आयोजित कार्यक्रमात रविवारी १० मे २०२६ सायंकाळी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
https://prahaar.in/2026/05/11/bharath-kanth-31-year-old-emerging-telugu-actor-dies-in-road-accident-car-hits-truck-on-outer-ring-road-in-hyderabad/
उप महापौर संजय घाडी म्हणाले की, दहिसर नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे लोकार्पण हे मातृदिनी होत आहे, याचा आनंद आहे. नागरिकांना नदीत कचरा न टाकण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत हात जोडून करावे, असे ते म्हणाले. तसेच बेशिस्तपणे, सातत्याने कचरा टाकणार्यांवर दंडात्मक कारवाई करावी. प्रदूषण मुक्तीसाठी सर्व स्तरावर प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
https://prahaar.in/2026/05/11/maharashtra-govt-minister-ashish-shelar-department-took-three-decision-after-pm-modi-appeal-to-restrain-petrol-diesel-use/
दहिसर एसटीपी प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक गॕरेज, वाहन धुणे, इमारत बांधकाम, रस्ते स्वच्छता यासारख्या बाबींसाठी पाण्याची गरज भागविण्याकरिता मदत होणार आहे. येत्या काळात दहिसर प्रकल्प बाधितांसाठी राहण्यासाठी घरे देण्याची प्रक्रिया वेगवान होईल. या प्रकल्पात १,२४४ प्रकल्प बाधितांसाठी घराची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे स्थानिक आमदार मनीषा चौधरी यांनी सांगितले.
प्रकल्पाचे वैशिष्ट्य:
दहिसर नदी पुनरूज्जीवन प्रकल्प (टप्पा क्रमांक १)
मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेला दहिसर नदी पुनरूज्जीवन व सौंदर्यीकरण प्रकल्प (टप्पा १) पूर्ण झाला आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश नदीतील सांडपाणी अडवणे, नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारणे आणि नदी परिसरातील नागरी पर्यावरण अधिक सक्षम व स्वच्छ करणे हा आहे.
https://prahaar.in/2026/05/11/sunil-tatkare-sunil-tatkare-brought-jai-pawar-to-his-senses-regarding-the-chief-ministers-post/
दोन्ही मलनि:सारण प्रक्रिया केंद्रातील बांधकाम व यांत्रिक कामे पूर्ण झाली आहेत. आगामी १५ वर्षांसाठी प्रचालन व परिरक्षण प्रक्रियेची जबाबदारी यामध्ये सोपविण्यात आली आहे. या केंद्रामध्ये प्रक्रिया केलेले पाणी बागेसाठी, रस्ते स्वच्छता, औद्योगिक वापर, तसेच इतर वापरासाठी करणे शक्य आहे. या पाण्याच्या उपलब्धतेमुळे शाश्वत जलव्यवस्थापनाला चालना मिळणार आहे.