Home महाराष्ट्र नाशिक Nashik : द्वारका ते नाशिकरोड रस्ता लवकरच दहापदरी होणार

Nashik : द्वारका ते नाशिकरोड रस्ता लवकरच दहापदरी होणार

0
Nashik : द्वारका ते नाशिकरोड रस्ता लवकरच दहापदरी होणार
Construction of newly finished, empty highway.

Nashik : नाशिकरांसाठी आनंदाची बातमी आहे. नाशिकमधील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असलेला द्वारका ते नाशिकरोड रस्ता हा लवकरच दहापदरी होणार आहे , यासाठी केंद्राकडून देखील अंतिम मंजुरी मिळाली आहे. द्वारका ते नाशिकरोड हा आठ किलोमीटर लांबीचा रस्ता आता दहापदरी होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत या रस्त्यावरील गर्दी नियंत्रणात येण्यास मोठी मदत होणार आहे. या रस्त्यासाठी सुमारे २५८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून शुक्रवारी केंद्र सरकारने या प्रकल्पाला अंतिम मंजुरी दिली.

https://prahaar.in/2026/05/09/ashok-kharat-case-as-soon-as-he-asked-a-question-ashok-kharat-got-angry/

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात नियोजन आणि विकासकामे सुरु आहे. देशभरातून येणारे भाविक प्रामुख्याने रेल्वेमार्गे येण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे नाशिक रोड रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर भाविकांना नाशिक शहरात नाशिक रोड ते व्दारका या रस्त्यानेच यावे लागणार आहे. भाविकांच्या या गर्दीला सामावून घेण्यासाठी नाशिक रोड ते व्दारका रस्त्याचे रुंदीकरण आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक मनपाकडून हालचाली सुरु झाल्या.

रस्ता रुंदीकरणासाठी नाशिक महापालिकेकडून २७६ कोटींचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (National Highways Authority of India (NHAI))  सादर करण्यात आला. प्राथमिक बैठकीत नाशिक रोड ते व्दारका रस्ता दहा पदरी करण्यासंदर्भात ‘NHAIने प्रस्तावात फेरबदल करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार महापालिकेकडून दुरुस्तीसह सुधारित प्रस्ताव सादर करण्यात आला होता. आता केंद्र सरकारकडून या प्रकल्पाला अंतिम मंजुरी देण्यात आली आहे, त्यामुळे लवकरच या रस्त्याचे काम सुरु होण्याची चिन्हे आहेत. (Dwarka to Nashik road will soon be ten-lane)

व्दारका ते नाशिक रोड दरम्यान साडेसहा किलोमीटर अंतराचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. परंतु, राज्य वित्त आयोगाच्या तांत्रिक मंजुरीअभावी कामाला सुरुवात झाली नव्हती. केंद्राने नाशिक रोड ते व्दारका या संपूर्ण आठ किलोमीटर रस्त्याचे दहापदरी करण्यास अंतिम मंजुरी दिल्याने या भागातील रहिवाशांची नेहमीच्या वाहतूक कोंडीच्या दगदगीतून मुक्तता होणार आहे.

https://prahaar.in/2026/05/08/ashok-kharat-case-money-found-in-kharats-bank-locker/

दहापदरी रस्त्याचे स्वरुप कसे असेल ?

नाशिक ते पुणे आणि मुंबई ते आग्रा हे महामार्ग नाशिकमधील व्दारका या चौकात एकमेकांना छेदतात. त्यामुळे याठिकाणी कायमच वाहतूक कोंडी होण्यास वाव मिळतो. विशेष म्हणजे गर्दीचे ठिकाण म्हणूनच हा रस्ता ओळखला जातो. प्रचंड वाहतुकीमुळे द्वारका चौक ते दत्त मंदिर सिग्नल यादरम्यान कायमच वाहतूक कोंडी होत असते. हा रस्ता दहापदरी होणार असल्याने दोन्ही बाजूंनी तो पाचपदरी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे. या रस्त्याला अंतिम मंजुरी मिळाल्याने आता त्याचे काम लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here