कोलकाता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत All India Trinamool Congress (TMC) ला अनपेक्षित आणि मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले असून राज्यात प्रथमच भाजपाने स्पष्ट बहुमतासह सत्ता मिळवली आहे. अनेक वर्षांपासून बंगालच्या राजकारणावर वर्चस्व गाजवणाऱ्या तृणमूल काँग्रेससाठी हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे. निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदलले असून कार्यकर्त्यांपासून वरिष्ठ नेत्यांपर्यंत सर्वत्र चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर टीएमसीच्या पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी कोलकात्यातील कालीघाट येथील निवासस्थानी पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली. या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मात्र, पक्षाच्या ८० पैकी फक्त ७० आमदारच उपस्थित राहिल्याने आणि तब्बल १० आमदार गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
https://prahaar.in/2026/05/07/vijay-thalapathy-sarkar-movie/
दरम्यान, बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या १० आमदारांबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. काही आमदार पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा आहे, तर काही जण भाजपाच्या संपर्कात असल्याचे दावे राजकीय वर्तुळात केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर TMC मध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.
https://prahaar.in/2026/05/07/vietnam-president-to-lam-vietnam-presidents-economic-salute-to-india-by-ringing-the-nse-bell-new-momentum-for-bilateral-trade-from-mumbai/
https://prahaar.in/2026/05/07/bihar-oath-ceremony-2026-samrat-chaudhary-s-mega-cabinet-expansion-in-bihar-modi-shahs-presence-at-gandhi-maidan-for-the-swearing-in-ceremony/