– स्थायी समितीच्या मंजुरीपूर्वीच कामाला केली सुरुवात
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबई महापालिकेच्या केईएम, शीव, नायरसह उपनगरातील चार रुग्णालयांच्या स्वच्छतेसाठी आता तीन वर्षांकरता खासगी संस्थेची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सर्व रुग्णालयांसाठी केवळ एकाच संस्थेला काम देण्यात आले असून स्थायी समितीची मान्यता नसतानाही मार्च पासून प्रत्यक्षात या संस्थेच्या माध्यमातून कामालाही सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेत भाजपची सत्ता आली असली तरी प्रशासन आजही प्रशासकाच्या काळात असल्यासारखे वावरत आहे. त्यामुळे भाजप आता या महापालिकेच्या रुग्णालयांमधील स्वच्छतेच्या कामांमधील प्रशासनाचा हा ‘ऑरा ‘ उतरवणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.
https://prahaar.in/2026/05/05/sit-to-investigate-the-bogus-birth-and-death-certificate-case-in-mumbai/
https://prahaar.in/2026/05/05/new-curriculum-for-grades-2-3-4-and-6-from-the-academic-year-2026-27/