मुंबई : जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर एक अर्ज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, हा अर्ज पूर्णपणे बनावट आणि अनधिकृत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अशा कोणत्याही फसव्या लिंक किंवा अर्जांपासून दूर राहावे, असे ठाम आवाहन करण्यात आले आहे. (Census 2027)
https://prahaar.in/2026/05/05/gold-silver-rate-golds-shine-fades-big-drop-in-two-days-silver-also-cheap/
दुसरा पर्याय म्हणजे प्रत्यक्ष माहिती देण्याचा. दिनांक १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत अधिकृत प्रगणक नागरिकांच्या घरी भेट देऊन माहिती संकलित करतील. या भेटीदरम्यान नागरिकांनी योग्य आणि खरी माहिती देऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.
तसेच, अधिकृत प्रगणकांची ओळख पटवूनच माहिती द्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे. प्रगणकांकडे अधिकृत ओळखपत्र असणार असून नागरिकांनी ते तपासूनच प्रतिसाद द्यावा.
https://prahaar.in/2026/05/05/iran-america-war-iran-claims-to-have-attacked-a-us-warship-in-the-strait-of-hormuz/
जनगणना ही देशाच्या नियोजन आणि विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असल्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने सहभाग नोंदवावा, तसेच अफवा आणि फसवणुकीपासून दूर राहावे, असेही प्रशासनाने नमूद केले आहे.