मुंबई : तुमचा फोन अचानक वाजला आहे का? तर घाबरू नका. दूरसंचार विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संयुक्तपणे ‘सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टीम’ची देशव्यापी चाचणी घेत आहेत.
देशभरातील अनेक नागरिकांच्या मोबाईलवर अचानक “Extremely Severe Alert” असा इशारा झळकल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र हा कोणताही खरा धोका नसून, Government of India कडून राबवण्यात येणाऱ्या नव्या आपत्ती सूचना प्रणालीची ही चाचणी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या अलर्टमध्ये भारताने स्वदेशी तंत्रज्ञानाच्या मदतीने Cell Broadcast System सुरू केल्याची माहिती देण्यात आली. नैसर्गिक आपत्ती, भूकंप, पूर किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तात्काळ सूचना देण्यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
या संदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की,
– हा फक्त चाचणी संदेश (Test Message) आहे
– नागरिकांनी घाबरण्याची किंवा कोणतीही कृती करण्याची गरज नाही
https://prahaar.in/2026/05/02/hsc-result-2026-12th-result-2026-announced-89-79-students-pass-in-the-state-konkan-wins-again/
View this post on Instagram
दरम्यान, अचानक आलेल्या या अलर्टमुळे अनेक नागरिक सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना दिसले. काहींनी याला “नवीन आणि उपयुक्त पाऊल” म्हटले, तर काहींनी सुरुवातीला घाबरल्याचेही सांगितले.
https://prahaar.in/2026/05/02/breaking-news-shocking-4-year-old-girl-brutally-murdered-angry-villagers-take-to-the-streets/
सरकारकडून अशा प्रकारच्या चाचण्या पुढेही केल्या जाण्याची शक्यता असून, नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत सूचनांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.