मुंबई : पायधुनी परिसरात एका कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने मुंबई हादरली होती. सुरुवातीला कलिंगड खाल्ल्याने अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र आता समोर आलेल्या फॉरेन्सिक अहवालामुळे या प्रकरणाला पूर्णपणे नवे आणि गंभीर वळण मिळाले आहे.
फॉरेन्सिक तपासणीत मृतांच्या शरीरातील अंतर्गत अवयवांमध्ये असामान्य बदल दिसून आले आहेत. मेंदू, हृदय आणि आतडी यांचा रंग बदलून हिरवट झाल्याचे निदर्शनास आले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, असा बदल सामान्य अन्नविषबाधेत दिसत नाही आणि हा अत्यंत विषारी रासायनिक घटकाचा परिणाम असू शकतो. मात्र या अहवालाला अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
https://prahaar.in/2026/05/01/lpg-gas-price-hike-inflation-flare-up-gas-cylinder-becomes-expensive-by-rs-993-know-how-much-will-you-have-to-pay-for-one-cylinder/
सुरुवातीला कलिंगडामुळे झालेल्या विषबाधेचा संशय होता, मात्र मॉर्फिनचा शोध लागल्यानंतर हा अपघात आहे की घातपात, याबाबत पोलिसांचा संशय अधिक गडद झाला आहे. पोलिसांनी आता कलिंगड विक्रेता, अन्न सेवनाचा तपशील तसेच कुटुंबाचा वैद्यकीय इतिहास या सर्व बाजूंचा सखोल तपास सुरू केला आहे.
https://prahaar.in/2026/05/01/madhya-pradesh-narmada-cruise-accident-cruise-sinks-in-bargi-dam-4-dead-10-15-missing/
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तपास यंत्रणांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. पोलिस आता या प्रकरणाचा प्रत्येक पैलू तपासत असून लवकरच सत्य समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.