Home ब्रेकिंग न्यूज Breaking News : विधान परिषदेआधी मोठी घडामोड; बच्चू कडू आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार!

Breaking News : विधान परिषदेआधी मोठी घडामोड; बच्चू कडू आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार!

0
Breaking News : विधान परिषदेआधी मोठी घडामोड; बच्चू कडू आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार!
bachchu kadu - eknath shinde

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडण्याच्या मार्गावर आहे. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार जनशक्ती पक्ष हा पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आज बच्चू कडू (Bachchu Kadu) विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निर्णयामुळे विशेषतः विदर्भातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची चिन्हे आहेत.

बच्चू कडू यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेतूनच केली होती. त्यानंतर त्यांनी ‘प्रहार’च्या माध्यमातून स्वतंत्र ओळख निर्माण केली. आता ते पुन्हा आपल्या मूळ पक्षात परतण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.

https://prahaar.in/2026/04/30/breaking-news-shocking-radioactive-threat-to-rss-headquarters-excitement-in-nagpur-security-forces-on-alert/

सूत्रांच्या माहितीनुसार, काल रात्री मुंबईतील ‘वर्षा’ या अधिकृत निवासस्थानी एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत पक्ष विलीनीकरण, तसेच भविष्यातील राजकीय भूमिका आणि जबाबदाऱ्यांवर सविस्तर चर्चा झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘प्रहार’चा राजकीय पक्ष भाग शिवसेनेत विलीन होणार असून, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली ‘प्रहार’ संघटना मात्र स्वतंत्रपणे कार्यरत राहणार आहे.

https://prahaar.in/2026/04/29/split-in-mva-over-maharashtra-legislative-council-candidature/

या घडामोडीनंतर पुढील काही महिन्यांत बच्चू कडू यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या कोट्यातून त्यांना विधानपरिषदेवर पाठवण्याची तयारी सुरू असून, त्याचाच भाग म्हणून ते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.