नवी दिल्ली : घरकामात मदत व्हावी म्हणून आपण नोकर ठेवतो, त्यांच्यामुळे घरातील अनके काम करणं सहज शक्य होत. हीच लोक घरातील सदस्य केव्हा बनतात ते कळतच नाही, कळत नकळत आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू लागतो, आपली घरातील खासगी माहितीसुद्धा आपण सांगून बसतो, पण तोच माणूस जर वाईट निघाला तर आपलं अख्ख घर उद्ध्वस्त देखील होऊ शकतं.
नेमकं घडलं काय?
राजस्थानच्या अलवर येथे राहणार राहणारा राहुल मीना (२३) दिल्लीत एका IRS अधिकाऱ्याच्या घरी वर्षभरापासून नोकरीवर होता. वर्षभर सर्व सुरळीत चाललं होत, कुटुंबाशी त्याचे संबंध हे चांगलेच होते. वर्षभर एकाच घरात काम केल्यामुळे त्याला त्या घराची खडान्खडा माहिती होती. घरातील लोकांची दिनचर्या देखील त्याला माहित होती. याच गोष्टीचा त्याने फायदा घेते एक हसत खेळात कुटुंब उध्वस्थ केल.
https://prahaar.in/2026/04/23/actor-vipul-roy-theft-plot-hatched-under-the-guise-of-domestic-work-maid-absconds-with-lakhs-of-rupees-belonging-to-actor-vipul-roy/
लॉक कोड्स क्रॅक करून….
घरात प्रवेश करण्यासाठी चार डिजिटल लॉकस होते परंतु अधिकाऱ्याची घराची रचना, घरात प्रवेशासाठीचे ऍक्सेस कोड्स, आणि चाव्या ठेवण्याची ठिकाणे, याची माहिती असल्याने अधिकारी आणि त्याची पत्नी बाहेर गेल्यावर त्याने डाव साधला. कोणालाही संशय न येत तो घरात वावरू शकला.
कामावरून काढले याचा राग
अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार त्याचा स्वभाव आणि त्याच्यावर गुन्हे दाखल होते. घरी येणाऱ्या वस्तूंसाठी जे पैसे वापरले जायचे त्यामध्ये त्याने अफरातफरी करायचा, पैसे स्वतःकडे ठेवून दुकानातून उधारी करून वस्तू आणायचा. या गोष्टींमुळे अधिकार्याने त्याला कामावरून काढून टाकले, या गोष्टीचा राग आरोपी राहुलच्या मनात होता.
अधिकाऱ्याची चूक, मुलीला शिक्षा
कामावरून काढल्याच्या रागातून , सकाळी जिम साठी गेले असता, राहुल घरात घुसला, लॉकस क्रॅक करून त्याने अधिकाऱ्याच्या २२ वर्षीय मुलीवर बलात्कार केला, चार्जेरच्या वायरने तिचा गळा आवळून तिची हत्या केली, तसेच घरातील दागिने, अडीच लाख रुपये घेऊन तो फरार झाला.
मयत तरुणीही इंजिनिअरिंगची पदवीधर असून ती यूपीएससीचा अभ्यास करत होती. आई वडील जेव्हा घरी आले तेव्हा ती रक्ताचा थारोळ्यात पडलेली आढळली. अंगावरचे कपडे देखील फाटलेल्या अवस्थेत होते.
https://prahaar.in/2026/04/22/accused-ayan-paraded-through-paratwada-achalpur/
आरोपीला जुगारच नाद असल्याने अनेक ठिकाणी तो पैसे हरला होता, त्याला पैसे कमी पडत होते म्हणून त्याने हे दुष्कृत्य केल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा पोलीस शोध घेत असणं आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे.