Home ब्रेकिंग न्यूज Bhabha hospital : वांद्रे भाभा, कुर्ला भाभा आणि भगवती रुग्णालयांत कॅथलॅब

Bhabha hospital : वांद्रे भाभा, कुर्ला भाभा आणि भगवती रुग्णालयांत कॅथलॅब

Bhabha hospital : वांद्रे भाभा, कुर्ला भाभा आणि भगवती रुग्णालयांत कॅथलॅब
Bhabha hospital

पुढील ३० वर्षांसाठी संस्थांची केली निवड

रुग्णालयातील जागा भाडेतत्वावर देण्यात येणार

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे के. बी. भाभा रुग्णालय, कुर्ला के. बी. भाभा रुग्णालय, आणि बोरीवलीतील हरीलाल भगवती रुग्णालय या तीन उपनगरीय रुग्णालयांमध्ये कॅथ लॅब सुरु करण्यात येणार आहे. यासाठी अनुक्रमे रुबी ऐल केअर सर्विसेस प्रा. लिमिटेड व सुराना चेरीटेबल ट्रस्ट या संस्थेची निवड करण्यात आली असून प्रत्येकी दहा याप्रमाणे तीस वर्षांकरता या संस्थेच्यावतीने कॅथ लॅब चालवण्यासाठी जागा भाडेतत्वावर दिली जाणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे के. बी. भाभा रुग्णालय, कुर्ला के. बी. भाभा रुग्णालय, आणि बोरीवलीतील हरीलाल भगवती रुग्णालय या ३ उपनगरीय रुग्णालयांमध्ये कॅथ लँब या रुग्णोपयोगी सुविधा सार्वजनिक खाजगी सहभाग प्रोत्साहन धोरणांतर्गत प्रथम १० वर्षाकरिता व नंतर सेवा समाधानकारक असल्यास दहा अधिक दहा वर्षासाठी नूतनीकरणास सापेक्ष अशा एकूण ३० वर्षाकरिता सुरु करण्याबाबत महापालिकेच्यावतीने निविदा मागण्यात आली होती. त्यानुसार प्राप्त संस्थेची कॅथलॅब करता निवड करून संबंधित रुग्णालयांमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी ही जागा देण्याबाबत प्रशासनाच्यावतीने प्रस्ताव सुधार समितीत सादर करण्यात आला अहे.

केईएम, शीव, नायर, आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांमध्ये कॅथलॅब सुविधा उपलब्ध आहेत. केईएम रुग्णालयात नुकतीच ‘रॅडियल लाऊंज’सह अत्याधुनिक सुविधा सुरू करण्यात आली आहे.

कॅथलॅब ही हृदयविकाराचे निदान आणि उपचारांसाठी वापरली जाणारी अत्याधुनिक प्रयोगशाळा आहे, जिथे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि स्टेंटिंग यांसारख्या प्रक्रिया कमीत कमी चिरफाड करून केल्या जातात. वाढत्या हृदयविकार रुग्णांमुळे सरकारी रुग्णालयांमध्ये पीपीपी तत्त्वावर कॅथलॅब सुरू करण्यात येत आहेत

या कॅथ लॅबसाठी अशाप्रकारे केली संस्थांची निवड

के. बी. भाभा रुग्णालय, वांद्रे

एकूण क्षेत्रफळ : ४८९.१० चौरस मीटर

वार्षिक शुल्क : १३ लाख १२ हजार ०९० रुपये

संस्थेची नेमणूक : रुबी ऐल केअर सर्विसेस प्रा. लि.

के. बी. भाभा रुग्णालय, कुर्ला

एकूण क्षेत्रफळ : २१०.६१ चौ. मीटर

वार्षिक शुल्क : २ लाख ८५ हजार रुपये

संस्थेची नेमणूक : रुबी ऐल केअर सर्विसेस प्रा. लि

बोरीवली हरीलाल भगवती रुग्णालय, बोरीवली

एकूण क्षेत्रफळ : ७३०.७३ चौ. मीटर

वार्षिक शुल्क : ९ लाख रुपये

संस्थेची नेमणूक : सुराना चेरीटेबल ट्रस्ट